वारजे माळवाडी आज हे नाव घेतलं की जो अभिमान स्वाभिमान आणि सन्मान संपूर्ण पुणे शहरात मिळतो त्यामागचं कारण म्हणजे होय वारजे बदललय! पुण्याच्या पश्चिम दिशेला सांस्कृतिक सामाजिक आणि वैचारिक विचारांची पेरणी ज्या साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून झाली त्याच वटवृक्षाच्या छत्रछायेखाली सुशील सुसंस्कृत आणि विनयशील भूषणावह भारतभूषण शरदआबा बराटे युवा नेतृत्वाचा उदय होत आहे. बदललेल्या वारजेच्या नव्या उंबरठ्यावर या नेतृत्वाने आपल्या घरातूनच मिळालेल्या प्रगल्भ वारश्याच्या जीवावर नव्या वारजे माळवाडीची नस ओळखत आपला कार्य आरंभ केला असून ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली घराघरात या नव्या नेतृत्वाच्या चर्चा पोहोचवण्यामध्ये यशही मिळवले आहे. अशा या विनयशील नेतृत्वास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
वारजे माळवाडी चे नाव घेतलं की त्याबरोबर संपूर्ण पुणे शहरात जे नाव घेतले जातात ते म्हणजे दिलीपभाऊ बराटे यांचे! कारणही तशीच आहेत कारण वारजे घडत असताना वाढत असताना ज्या मूलभूत गोष्टींची गरज आवश्यक होती त्या सर्व गोष्टी करण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट अन दूरदृष्टी या नव्या नेतृत्वाने अगदी जवळून पाहिली अन आत्मसातही केली आहे. गावाचा विकास होताना सांस्कृतिक वैचारिक विकासही किती महत्त्वाचा आहे याची जाण घरातच झाल्यामुळे वारजे माळवाडी घडताना त्याची सांस्कृतिक ठेवणंही त्याच उच्च कोटीची व्हावी यासाठी झटलेल्या घरातूनच भारतभूषण बराटे या नेतृत्वाचा कार्यारंभ झाला आहे. सुरुवातीची काळामध्ये या नवख्या तरुणाकडे फक्त तरुणाईची साथ आहे असे वाटत असतानाच आपल्या नेतृत्व कौशल्याच्या साथीने आज या नवतरुणाने समाजातील दिन -दुबळ्या चेहऱ्यावरती हास्य उमटवले असून परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी ध्येय धोरणांची अंमलबजावणी करण्याकडेही मोठा कल दिला आहे. वारजे माळवाडी परिसरामध्ये उच्च विद्याभूषित अन प्रगल्भ लोकांची मांदिआळी वाढत असताना त्यांच्या वैचारिक आणि व्यासंगी विचारांना व्यासपीठ देण्याचे काम एकीकडे सुरू केले तर दुसरीकडे पुणे शहरातील सर्वाधिक अकुशल कष्टकरी लोकवस्ती म्हणून या भागाची नव्याने ओळख तयार होत असताना त्यांच्या समस्या सोडवण्यालाही प्रथम प्राधान्य देण्यात धन्यता मानली.
महाराष्ट्राच्या मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र यासारख्या भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतरणांनी लोकवस्ती वाढत असतानाच त्यांच्या सोयी सुविधांसाठी प्रसंगी स्वखर्चातून मदतीसाठी धावणारे नेतृत्व म्हणून या नेतृत्वाकडे पाहिले जात आहे. सुरुवातीला पारंपरिक विरोधकांना शह देण्यासाठी हा कार्यारंभ झाला असल्याची चर्चा संपूर्ण परिसरामध्ये असतानाच आपल्या वैचारिक बैठकीने ही वाटचाल बदललेल्या वारजे माळवाडीच्या घराघरात पोचले असून वारजे माळवाडीच्या “नव्या उंबरठ्याचं नव नेतृत्व!” म्हणूनही सध्या चर्चेत आहे. पारंपारिक राजकीय हेवेदावे करण्यापेक्षा परिसराच्या विकासासाठी नव्या योजना नव्या संकल्पना आणि नवतरुणांना एकत्र घेत एक नव अभियान सुरू करण्यात या नेतृत्वाला यश प्राप्त झाले आहे. वारजे माळवाडीच्या प्रगल्भ विकासासाठी 1970पासून झटत असलेल्या आपल्या वडीलधारी मंडळींच्या शिदोरीच्या परंपरेतून नव्या विचाराची पक्की बांधीलकी भारतभूषण बराटे यांनी केली आहे.
पुणे शहरातील शैक्षणिक परंपरेचा वारसा वारजे माळवाडी भागातही जपला जावा, परिसरामध्ये बहुमजली इमारतीमधील मुलांप्रमाणेच कष्टकरी आणि मध्यमवर्गीय मुलांनाही शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी भारतभूषण बराटे यांचे विशेष प्रयत्न असतात. सर्वसामान्य लोकांची आपुलकीने चौकशी करणे त्यांच्या अडीअडचणी सोडवणे प्रसंगी स्व- अर्जित पैशाचा वापरही करण्याची गरज पडली तरी सुद्धा नव्या पिढीच्या भवितव्याकडे या नेतृत्वाने कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. सर्वसाधारणपणे राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी कोणताही फायदा बघूनच इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु असते परंतु घराण्याचा वारसा आणि विचारांची पक्की बांधणी या दुग्धशर्करा योगाच्या जीवावर भारत भूषण बराटे नव्या वारजे माळवाडीचे नव नेतृत्व तयार झाले असून ज्येष्ठ, महिला, विद्यार्थी आणि तरुणांना या नेतृत्वामध्ये विकासाची कास दिसत असल्याने जनाधार दिवसेंदिवस वाढतच आहे.