मुळशी तालुक्यातील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक जाहीर झाल्यापासून यंदा निवडणुकीमध्ये अजितदादा यांच्या दबावाला बळी पडत संस्थापक अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांच्याकडून कायम मवाळ भूमिका घेत सर्वपक्षीय लोकांना एकत्र करण्याची भूमिका घेतली परंतु या सर्व प्रयत्नांमध्ये संस्थापक अध्यक्षांनाच अखेरच्या क्षणी शरणागतीच पत्करावी लागली आहे की काय अशी चर्चा सध्या परिसरात सुरू झाली आहे. कारणही तसेच आहे 21 संचालकांच्या मंडळामध्ये फक्त ४च सदस्यांची वर्णी लावण्यामध्ये त्यांना यश आल. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री संत तुकाराम सह. साखर कारखाना संस्थापक चेअरमन विदुराजी उर्फ नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वामध्ये सन २०२५-२०३० करिता संचालक मंडळ बनवताना बरीच तारेवरची कसरत करावी लागली परंतु यामध्ये विशेष बाब म्हणजे विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाट्याला मात्र वाटाण्याच्याच अक्षदा आल्या असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. विशेष म्हणजे एवढा सगळा अट्टाहास करूनही संबंधित निवडणूक बिनविरोध करण्याबाबत मध्यरात्रीपर्यंत (अर्ज माघारी घेण्यास दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत) खलबते सुरू होती. आज सकाळी 11 वाजता अधिकृत यादी जाहीर झाल्यानंतरच या सगळ्या प्रयत्नांना किती यश आले आहे याची जाणीव होणार आहे.
श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना पाच तालुक्यांमध्ये कार्यक्षेत्र असल्याने या निवडणूकिचे बिगुल वाजल्यापासून मावळचे विद्यमान आमदार सुनील आण्णा शेळके आणि संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले या दोघांच्या भूमिका अत्यंत महत्त्वाच्या असतानाच आमदार सुनील शेळके यांनी आपल्या राजकीय वजनाचा वापर करून अत्यंत हुशारीने संस्थापकांच्या ताब्यातून अलगद साखर कारखाना मिळवला अशी ही नवी चर्चा आता सुरू झाली आहे. श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील केंद्रीय मंत्री 5 आमदार आणि माजी आमदार विद्यमान खासदार अशी गडगंज मांदीआळी असतानाही सर्वाधिक सदस्य संचालक करण्यामध्ये सुनील शेळके यांनी बाजी मारली आहे. त्यातच विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या वतीने सुचवण्यात आलेल्या दिलीप दगडे, महादेव कोंढरे, अंकुश उभे, लक्ष्मण भरेकर या नावांना वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या दोन गोष्टींमुळे (माऊली दाभाडे आणि बापू भेगडे) श्री संत तुकाराम साखर कारखान्याची निवडणूक चुरशीची अन् प्रतिष्ठेची झाली त्या नावांना मात्र नव्या संचालक मंडळामध्ये स्थान मिळाले आहे.
संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार-
गट क्र. १ हिंजवडी- ताथवडे
१ नवले विदुराजी विठोबा (संस्थापक)
२ भुजबळ चेतन हुशार (नानासाहेब नवले)
३ जाधव दत्तात्रय गोपाळ (आमदार शंकर मांडेकर)
गट क्र. २ पौड – पिरंगुट
१ ढमाले धैर्यशील रमेशचंद्र (आमदार शंकर मांडेकर )
२ गायकवाड यशवंत सत्तू (आमदार शंकर मांडेकर )
३ उभे दत्तात्रय शंकरराव (केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ )
गट क्र. ३ तळेगाव वडगाव
१ भेगडे बापुसाहेब जयवंतराव (नानासाहेब नवले)
२ दाभाडे ज्ञानेश्वर सावळेराम (आमदार सुनील शेळके)
३ काशिद संदीप ज्ञानेश्वर (माजी मंत्री बाळा भेगडे)
गट क्र. ४ सोमाटणे – पवनानगर
१ कडू छबुराव रामचंद्र (आमदार सुनील शेळके)
२ लिम्हण भरत मच्छिंद्र (आमदार सुनील शेळके)
३ बोडके उमेश बाळू (आमदार सुनील शेळके)
गट क्र. ५ खेड- शिरूर- हवेली
१ लोखंडे अनिल किसन (नानासाहेब नवले)
२ कातोरे विलास रामचंद्र (माजी आमदार दिलीप मोहिते)
३ काळजे अतुल अरूण (आमदार महेश लांडगे)
४ भोंडवे धोंडीबा तुकाराम (आमदार शंकर जगताप)
महिला राखीव
१ अरगडे ज्योती केशव (आमदार बाबाजी काळे)
२ वाघोले शोभा गोरक्षनाथ (आमदार सुनील शेळके)
अनुसूचित जाती / जमाती
भालेराव लक्ष्मण शंकर (आमदार सुनील शेळके)
इतर मागासवर्ग
कुदळे राजेंद्र महादेव (आमदार शंकर मांडेकर )
विमुक्त जाती/भटक्या जमाती
कोळेकर शिवाजी हरिभाऊ ( माजी आमदार दिलीप मोहिते)