मुंबई दि. १ (रामदास धो. गमरे) “आपला देश गुलामीतून मुक्त झाला असला तरी भारतीय नागरिकांना आदर्श जीवन जगण्यासाठी काही अंकुश असावा यासाठी कायदे बनविण्यात आले आहेत जसे की मी अहिंसा करणार नाही, हत्या करणार नाही, दुसऱ्याचा विश्वासघात करणार नाही, राष्ट्राची आणि इतरांची संपत्ती हडप करणार नाही, राष्ट्राची हानी करणार नाही, कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणार नाही, विनयभंग करणार नाही, मी मद्यपदार्थांचं सेवन करणार नाही किंवा त्यासाठी इतरांना प्रवृत्त करणार नाही अश्या प्रकारच्या अनेक नितीमूल्यांना रराबविण्यासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत ह्या सर्व कायद्यांचा आधार हा पंचशील आहे, पंचशील हा एक जीवन जगण्याचा मार्ग आहे पंचशीलातील मूल्यांच्या आधारेच कायदे तयार झाले आहेत म्हणून संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे” असे प्रतिपादन वर्षावास प्रवचन मालिकेच्या नवव्या पुष्पाचे अध्यक्षीय स्थान भूषवित असताना बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती व कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद मोरे यांनी केले. सोबतच वर्षावास मालिकेचे नववे पुष्प गुंफत असताना प्रमुख वक्ता ललित शंकर जाधव यांनी “पंचशील” या विषयावर बोलत असताना अनेक उदाहरणे देत “बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याने प्रथम पाच ब्राम्हणांना प्रवचन दिले त्यावेळी त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर आले ते म्हणजे पंचशील होत, तथागत बुद्धांचा विशुद्धी मार्ग म्हणजे पंचशील होय, पंचशील हा आपल्या जीवनाचा पाया आहे” असे प्रतिपादन केले.
बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे त्या प्रवचन मालिकेचे नववे पुष्प उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर बा. मोरे यांनी आपल्या धीरगंभीर पहाडी आवाजात केले तर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून देत प्रस्ताविक सादर केले त्यावेळी स्मारकाच्या निधी करता बौद्धाचार्य, बौद्धाचार्या यांनी सढळ हस्ते धम्मदान करीत आपली मदत ऑक्टोबर पर्यंत जमा करावी असे आवाहन केले.
सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, कोषाध्यक्ष नागसेन गमरे, उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे, अतिरिक्त चिटणीस श्रीधर साळवी, लवेश जाधव, यशवंत कदम, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, तुकाराम घाडगे, रविंद्र शिंदे, रुपक देऊ मोरे, सिद्धार्थ कांबळे, महेंद्र पवार, मंगेश जाधव, महेश विष्णू साळवी, धोंडू परशुराम मोरे, सुगंध कदम, नरेश सकपाळे, मंगेश पवार, सुशीलाताई जाधव, अंजलीताई मोहिते, प्रमिलाताई मर्चंडे, विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती कार्यकारिणी, सर्व शाखांचे पदाधिकारी, सभासद, महिला मंडळ, बौद्धाचार्य, बौद्धाचार्या, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने दर्शन पांडुरंग जाधव व परिवार मुक्काम कवीनव्हाल, ता. माणगाव, जिल्हा रायगड यांनी धम्मदान रूपाने उपस्थितांना अल्पोपहाराचे वाटप केले. सरतेशेवटी मनोहर बा. मोरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व अल्पोपहार वाटप करणाऱ्या दर्शन पांडुरंग जाधव यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.