कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

0

संपूर्ण पुणे शहर दिवाळी उत्सव साजरा करत असताना कोथरूड या हिंदुत्ववादी भाजपच्या बालेकिल्ल्यात मात्र एन दिवाळीत महापालिका कारवाईचा धडाका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रभाग उपाध्यक्ष यांच्या तक्रारीची बातमी पुण्यातील नामांकित दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने थेट कारवाईचे संकेत दिले जात असून पुणे पोलिसांच्या वतीने बंदोबस्त मिळाल्यास ऐन सणासुदीमध्ये सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांच्या ‘किरकोळ हंगामी’ अतिक्रमणावर हातोडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे दोन मंत्री एक खासदार आणि सर्वंकष नगरसेवक अशी भरगच्च दबाव टीम असल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपूर्ण पुणे शहरात दिवाळी उत्सव आनंदात साजरा केला जात असताना कोथरूड परिसरामध्ये दिवाळी साहित्य, फटाके, आकाश कंदील आदी विविध वस्तूंची हंगामी दुकाने रस्ते, पदपथावर लावण्यात आली आहेत. काही आठवड्यांचा असलेला हा स्थानिक नागरिकांचा व्यवसाय अशी बोळवण करून संपूर्ण पुणे शहरांमध्ये विक्री सुरू असताना कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्येच याबाबत कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे महापालिकेच्या वतीने सुरक्षेच्याबाबत फटाक्यांची दुकाने असुरक्षितपणे व कोणतीही खबरदारी न बाळगता मुख्य रस्त्यावर उभारण्यात आल्या बाबत पुण्यातील नामांकित दैनिकांमध्ये सचित्र वृत्त प्रकाशित झाल्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली असून संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करण्याची संकेत वरिष्ठ पातळीवरून मिळाल्याने संपूर्ण कोथरूड परिसरातील फटाका व आकाश कंदील व्यावसायिकांच्यावर ‘संक्रात’ येण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

भारतीय जनता पक्षाचे सच एक पदाधिकारी यांना कोथरूड परिसराची अत्यंत संवेदनशील काळजी असल्याने काही दुर्घटना घडली, तर ती टाळण्यासाठी कारवाई करण्याची मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. गल्ली ते दिल्ली सत्तेत असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमार्फतच हरकती घेण्यात आल्यामुळे पुणे महापालिका प्रशासनही प्रचंड वेगाने सूत्र हलवत असून कोथरूड परिसरामध्ये नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सर्व फटाका स्टॉल कारवाई करून ‘भयमुक्त कोथरूड’ची दिवाळी करण्याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे. 

कोथरूड परिसरात रस्त्यांलगत लावण्यात आलेले आकाश कंदील फटाके व तत्सम दिवाळी साहित्य विक्रीचे स्टॉल प्रचंड प्रमाणात असून यामध्ये कोणती हानी घडल्यास त्यावर उपाय करण्यास सक्षम यंत्रणा पुणे महापालिकेकडे आहे का, असा प्रश्न संबंधित वृत्तांमध्ये विचारण्यात आला आहे. दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? जीवित हानी झाल्यास भरपाई कशी? अन् कोण करणार? असा गंभीर सवाल विचारण्यात आल्यामुळे पुणे महापालिकेच्या वतीने संपूर्ण कोथरूड परिसरात कारवाई करण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

नामांकित वृत्तसंस्थेने आनंदनगर मेट्रो स्थानक प्रवेशद्वारा समोर उभारण्यात आलेल्या फटाक्यांची दुकाने प्रकाशित केलेली आहेत. मेट्रो स्थानकावर पार्किंगसाठी व विद्युत वाहने चार्जिंगसाठी जी जागा असते तेथे दिवाळी साहित्याची दुकाने थाटली आहेत. (विशेष म्हणजे याच ठिकाणी त्याच मेट्रोच्या खाली केंद्रीय मंत्री यांचे सार्वजनिक गणेशोत्सव प्रचंड थाटामाटात साजरे केले जाते.) अनधिकृत जाहिरात फलक, फ्लेक्सची संख्यादेखील मोठी आहे. दिवाळी हा आनंदाचा सण आहे. त्यामध्ये विघ्न येईल असे कृत्य कोणी करू नये. महापालिकेने देखिल लोकांना शिस्त लावली पाहिजे. बेशिस्त लोकांवर नियंत्रण न ठेवल्यास त्याचा त्रास सर्वांनाच भोगावा लागेल. अशी मागणी करण्यात आली आहे. महापालिका कारवाईसाठी कोणाची वाट पाहत आहे, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिक यांनी उपस्थित केला.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

यासंदर्भात कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने दुकानदारांना नोटिसा काढण्यात आल्या असून अनधिकृत जाहिरात फलक व दुकानांवर आवश्यक बंदोबस्त मिळाल्यास कारवाई करण्यात येणार आहे. सध्या सणासुदीचा काळ असल्यामुळे पोलीस बंदोबस्त मिळताच तात्काळ कारवाई करण्यात येईल असेही सांगितले.