जातीय व धार्मिक तेढ वाढताना ‘स्वप्नील’सारखे विनम्र विकासाभिमुख नेतृत्व सांभळल पाहिजे सुप्रियाताईंचे गौरव उद्गार

0

राजकीय पोळ्या भाजण्यासाठी जाती-पातीत आणि धर्माधर्मात तेढ निर्माण करणे संविधान विरोधी असून ते देशासाठी आणि भावी पिढ्यांसाठी घातक आहे. पुणे शहरातील कोथरूड कर्वेनगर हा वैचारिक आणि बौद्धिक प्राबल्य लोकवस्ती असलेला प्रभाग असल्याने जातीय व धार्मिक तेढ वाढताना ‘स्वप्नील’सारखे विनम्र विकासाभिमुख नेतृत्व नागरिकांनी जनाधार देत सांभळल पाहिजे असे आवाहन करत खासदार सुप्रियाताईंनी स्वप्निल दुधाने यांच्या कार्याची सखल घेऊन गौरव उद्गार केले. माजी नगरसेविका सौ लक्ष्मीवाहिनी दुधाने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे  अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या पहिल्या धनुर्विद्या क्रीडा संकुलाचे भूमिपूजन व कोनशिला समारंभ कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने, माजी नगरसेवक सचिन दोडके, महापालिकेचे पुणे महापालिका भवन विभागाचे मुख्य अभियंता रोहिदास गव्हाणे, कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे, क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ आढाव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

विविधता हे भारताचे वैशिष्ट्य आहे आणि बलस्थानही आहे. जाती धर्माच्या नावाखाली समाजात तेढ उत्पन्न करणे घटनेच्या विरोधात आहे. देशामध्ये दुर्दैवाने 2014 पासून जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या गटांनाच प्रचंड ताकद मिळत असल्याने दुःखी मनाला स्वप्निल दुधाने यांच्यासारखे तरुण विनम्र विकास अभिमुख चेहरे पाहिलं की दिलासा वाटतो. जाती धर्मातील ही तेढ नष्ट करून विकास प्रकल्प व गुणवत्तेचा योग्य वापर एकी कायम ठेवण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये करत असल्याने नव्या नेतृत्वाबाबत अभिमान वाटावा असे काम स्वप्निल दुधाने यांच्यामार्फत केले जात आहे असे गौरव उद्गारही यावेळी सुप्रियाताई यांनी जाहीर व्यक्त केले.

संपूर्ण समाजाने अपप्रवृत्तीच्या विरोधात संघर्ष करणे अपेक्षित आहे. मग त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, कर्वेनगर भागामध्ये स्वप्नील दुधाने याच विचाराने गेली 25 वर्षे काम करत असून त्याचे प्रकल्प पाठपुरावा आणि विचाराची बांधणी पाहिल्यानंतर सर्वसामान्य ‘कर्वेनगर’वाशीयांना अभिमान वाटावा असे काम संपूर्ण प्रभागात एकटा निवडून आल्यानंतरही सुरू आहे. जर त्याच्या सोबतीला अन्य ३ नगरसेवक मिळाले तर संपूर्ण कर्वेनगरचा कायापालट शक्य आहे असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणे दौरे वाढलेले आहेत. केवळ महापालिका निवडणुकीला प्राधान्य न देता मुख्यमंत्र्यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर सातत्याने बैठका आयोजित करून पुण्याचे वाहतूक, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि कायदा सुव्यवस्था हे प्रश्न सोडवण्यालाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन सुळे यांनी केले. सातत्याने प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांना आवरा असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले. सरकारला विरोधासाठी विरोध करण्याची आपली भूमिका नाही. सरकार बरोबर आपले मतभेद असले तरी मनभेद नाही, असे सांगताना सुळे यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी सुरू केलेल्या खेलो इंडिया, या योजनेमुळे अनेक खेळाडू तयार झाल्याचे नमूद केले.

मागील 4 वर्षात महापालिका निवडणुका न झाल्यामुळे कोणतेही पद नसताना देखील आपल्या प्रभागात कामांचा धडाका सुरू ठेवणाऱ्या माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांचे सुळे यांनी कौतुक केले. सध्याच्या काळात सर्व स्तरांवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. ही ‘सत्ता राबवून लोकांची कामे न करता जय श्रीराम’च्या घोषणा देऊन धार्मिक तेढ वाढवण्याचे काम केले जात आहे. महागाई, बेरोजगारी या समस्या वाढतच आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत केवळ घोषणाबाजी करणाऱ्यांना मते न देता नागरिकांनी खरे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडून आणावे, असे आवाहन प्रशांत जगताप यांनी यावेळी केले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

स्वप्निल दुधाने यांनी नियोजित धनुर्विद्या क्रीडा संकुलाच्या तयारीसाठीची 4वर्षापासूनची वाटचाल प्रास्ताविकात सांगितले. गरीबांच्या मुलांमध्येही प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेचे चीज व्हावे यासाठी महापालिकेच्या माध्यमातून खेळाडूंना सुविधा मिळणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. या प्रकल्पासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि महापालिका अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळाल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले तर किशोर शेंडगे यांनी आभार मानले.