उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघात टीकेत वाढ; तांत्रिक तपासणी अंतिम टप्प्यात प्राथमिक अहवाल या दिवशी?

0

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमाना अपघाताला एक महिन्याचा कालावधी उलटत असताना कोणतेही प्रश्न उत्तर मिळत नसताना राज्यभर सर्वत्र टिकीची जोड उठत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार अपघातासंदर्भातील तांत्रिक तपासणी महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचली असून डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील माहिती यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आली आहे. यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. प्राथमिक तपास अहवाल 28 तारखेपूर्वी सादर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

फ्लाईट डेटामधून महत्त्वाची माहिती

तपास यंत्रणांना फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधून अपघाताच्या आधीची आणि लँडिंगदरम्यानची अनेक महत्त्वाची माहिती मिळणार आहे. त्यामध्ये –

अधिक वाचा  नागपूर पदवीधर ६४.७६ टक्के मतदान वर्धा, गडचिरोलीत सर्वाधिक प्रतिसाद; नागपूरमध्ये निरुत्साहच टक्केवारीही घटली

• लँडिंगवेळीची दृश्यमानता (Visibility)

• विमानाची उंची आणि वेग

• अपघातापूर्वीची उड्डाण स्थिती

• विमान कोसळताना नोंदलेले तांत्रिक पॅरामीटर्स

या सर्व बाबींचे विश्लेषण करून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरला नुकसान

तपासादरम्यान कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) उष्णतेमुळे अंशतः नुकसानग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वैमानिक आणि सहवैमानिकांमधील शेवटच्या संभाषणाचा डेटा पूर्णपणे मिळेल का, याबाबत तांत्रिक तपास सुरू आहे. तज्ज्ञांकडून डेटा पुनर्प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

रोहित पवारांच्या आरोपांवर केंद्राचे स्पष्टीकरण

दरम्यान, या अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांनंतर नागरी उड्डाण मंत्रालय यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. अपघाताची चौकशी आंतरराष्ट्रीय नागरी विमानन नियमांनुसार पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.

अधिक वाचा  शिवसेना शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला फडणवीसांचा हा शब्द, जरांगेंकडून शेअर ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी

महिन्याभरात अहवाल अपेक्षित

आंतरराष्ट्रीय विमान सुरक्षा नियमांनुसार विमान अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल साधारणपणे एका महिन्याच्या आत सादर केला जातो. त्यानुसार संबंधित तपास पथक अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी डेटा विश्लेषण, तांत्रिक अहवाल आणि तज्ज्ञांचे मत घेत आहे. दरम्यान, प्राथमिक अहवालानंतर अपघाताचे कारण, तांत्रिक बिघाड किंवा मानवी घटक याबाबत अधिक स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.