‘या’ गोष्टींमुळे लोकांचा आमच्यावर विश्वास, सरकार आमचंच येणार; छगन भुजबळांना विश्वास

0
1

राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. काल मतदान प्रक्रिया पार पडली. काल संध्याकाळी विविध एजन्सीचे पोल आले आहेत. यात काही पोलमध्ये महायुतीची सत्ता येणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही एजन्सीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार असं दिसतं आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. या एक्झिट पोलवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे सरकार आमचंच येणार, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

तीन-चार कंपन्यांचे एक्झिट पोल आले. त्यामध्ये तीन कंपनी आहे त्यांचं नावाचे उल्लेख करता येते. महायुतीच्या बाजूने कौल दिलाय यांचे सरकार बनते. सहा महिन्यामध्ये लाडकी बहीण योजना आणली. शेतकऱ्यांना वीज बिल माफ करणारी योजना आहे. शेतकरी सन्मान योजनेत बारा हजार वरून पंधरा हजार रुपये केले. मुलींना फुकट शिक्षण देण्याची योजना आहे. शेतकऱ्यांना एक रुपया घेत लाख दहा लाख रुपये पर्यंत पीक विमा दिला. महिलांसाठी अर्धा एसटीचे भाडे आहे. त्यामुळे लोकांना या योजनांचा फायदा झाला आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देऊ. अर्ध एसटीची भाडे पूर्ण पणे माफ करू. वृद्धांना बारा हजार रुपये वर्षा योजनेचा पंधरा हजार रुपये करू. अश्या काही गोष्टी आम्ही अमलात आणल्या. विकास कामे भरपूर मोठ्या प्रमाणात झाले. समृद्धी महामार्ग असेल. मुंबईमधले अनेक टर्नर्स आपण केले त्यातून फार सुधारणा, डेव्हलपमेंट विकास झाला आहे. या गोष्टीचा विचार करून मागच्या सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रमध्ये जो काही कल होता. तो आता बदललेला आहे. त्यावेळी लोकसभेला संविधान अमुकतमुक अशा अनेक गोष्टीचे गैरसमज पसरवल्या गेला. पण आता लोक महायुतीला कल देतील, असं भुजबळांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य