डोंबिवली स्फोटाने उडाला थरकाप, अजूनही मृतदेहांचे अवयव सापडणे सुरूच

0

डोंबिवलीतील अमुदान केमिकल कंपनीत स्फोट होऊन कित्येक तास उलटून गेले आहेत. मात्र अजूनही घटनास्थळावरून मानवी अवशेष सापडत आहेत. आज सकाळपासून अनेक मानवी अवशेष आसपासच्या कंपनीच्या ढिगार्‍याखाली आणि काही अवशेष छतांवर पडलेले एनडीआरएफ जवानांना मिळाले आहेत. आज पूर्ण दिवस एनडीआरएफ चे जवान सर्च ऑपरेशन करणार आहेत. यामुळे या स्फोटाची भीषणता समोर येत आहे. मानवी अवशेष अजूनही सापडत असल्याने अनेकांचा थरकाप उडाला आहे.

दोनदा लागली रात्री आग

काल रात्री दोन वेळेस एका कंपनीमध्ये छोट्या प्रमाणात आग लागली होती. मात्र ती आग ताबडतोब अग्निशमन दलाने विझवली. अशा घटनेची पुनरावृत्ती घडू नये यासाठी इथे असलेल्या सर्व कंपन्यांमधील रासायनिक द्रव्य ताबडतोब दुसरीकडे नेण्याचं काम आता सुरू करण्यात आले आहे.

मालकांवर गुन्हा दाखल

डोंबिवली मधील प्लॉट नंबर 229 वर असलेली अमुदान केमिकल कंपनीत रासायनिक प्रक्रिया तसेच कच्चे मालाची आणि अंतिम उत्पादनाची साठवणूक करते. पण याबाबत योग्य खबरदारी न घेतल्यास रसायनांचा स्फोट झाला. त्यात अनेकजण मृत्युमुखी तर अनेकजण जखमी झाले. घटनेला जबाबदार असलेल्या कंपनीचे मालक मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदिप मेहता यांच्यावर 304/324/326/285/286/427/ 34 तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान कलम 4 तसेच स्फोटके कायदा 1984 चे कलम 9बी / 9सी तसेच स्फोटके कायदा 1908 कलम 3,4,5,6 प्रमाणे मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

ओळख पटलेले मयत व्यक्ती

रिद्धी अमित खानविलकर (वय : 38 वर्ष )
रोहिणी चंद्रकांत कदम (वय : 26 वर्ष)
अनोळखी अजून 11 जण मयत
एकूण 13 जण मयत
जखमी व्यक्तींची नावे

1) सुदर्शन रामशीला मेहता वय 35

2) किशोर महादेव सावंत वय 51

3) संजय वासुदेव वाहतो वय 24

4) प्रिस सुभाषचंद्र गुप्ता वय 27

5) सागर वसंत डोहाळे व 28

6) चंद्र पाला रामोक्षवल भारद्वाज वय 34

7) मनोज योगेंद्र भगत 31

8) सुजाता गौरव कनोजिया वय 34

9) तेजल रमण गावित वय 23

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

10) विकास जगदीश मेहता वय 35

11) रामोशी चव्हाण वय 65

12) सागर रामचंद्र दास वय 30

13) रविकुमार कृष्णा दास वय 21

14) वासुदेव श्री बाजी यादव वय 48

15) राहुल सुधाकर पोटे व ते 30

16) रीना राजुराम कनोजिया वय 27

17) मनिषा निवृत्ती पोखरकर वय 46

18) अंकुश लिंगप्पा कुंभार 52

19) सोनू कुमार प्रयाग वर्मा व 21

20) अखिलेश पोदारी मेहता वय 36

21) शिवम विष्णुप्रसाद तिवारी 20

22) शिवराम आबा ढवळे वय 43

23) शिरीष चांगदेव तडेले व 65

24) रविचंद्र कुमार महेश राम वय 32

25) जय सरकार वय 27

26) रणविजय नारायण मिश्रा वय 46

27) रघुनाथ शिंगवन व 37

28) शैलेश प्रजापती वय 34

29) प्रकाश अशोक कांबळे 34

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

30) उज्वल देवेंद्र मानकर वय 30

31) रवींद्र चोरमारे

32) मानसी पाटील

33) यल्लाप्पा

34) अनिल बिंद

35) रमेश कुमार

36) किशोर प्रसाद विसपुते वय ४५

37) राजन विवाह गोठणकर वय ४७

37) मधुरा मयुरेश कुलकर्णी वय 37

38) बबन तुकाराम देवकर वय 43

39) हिमांगी सुनील चौकर व 56

40) अक्षता अशोक पाटील वय 24

41) प्रवीण शंकर चव्हाण व 46

42) प्रतिक वाघमारे

43) हृदयांश दळवी

44) रीमा विजय भारती वय 38

45) अश्विनी उमेश भालेराव वय 29

46) विनोद कुमार अनंतलाल दास वय 63

47) राजेंद्र मिश्रा 57

48) प्रसाद ढवळे वय 67

49) स्मिता धारवे वय 36

50) दिनेश मेहता वय 60

51) केतन मेहता वैद्य 54

52) रमेश्वर शुक्ला व 43

53) राजेंद्र कदम वय 55

54) सुरेश हरजी कोठारी 45