नावात काय आहे? विराट कोहलीच्या मुलीच्या नावाची इतक्या कोटींमध्ये विक्री

0

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आपल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे चर्चेत असतो. कसोटी, एकदिवशी किंवा टी-20 या तिन्ही प्रकारात त्याची कामगिरी जोरदार राहिली आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. सध्या सुरु असलेल्या आयपीएल 2024 मध्ये विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु (RCB) स्पर्धेतून बाहेर झाला आहे. परंतु या स्पर्धेत विराट कोहली याने खेळलेल्या धमाकेदार खेळी क्रिकेट प्रेमींना मंत्रमुग्ध करुन गेल्या. विराट कोहली, अनुष्का शर्मा यांच्याप्रमाणे त्यांची मुलगी वामिका वयाच्या तिसऱ्या वर्षीच प्रसिद्ध झाली आहे. यामुळे वामिकाच्या नावाला इंटरनेटच्या जगात प्रचंड मागणी आली आहे. वामिका डोमेन नेम इंटरनेटवर आठ कोटींपेक्षा जास्त रुपयांना मागितले जात आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

वामिका कोहलीच्या नावाला प्रचंड मागणी

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिका हिचा जन्म 11 जानेवारी 2021 रोजी झाला. वामिका या नावाचा अर्थ मां दुर्गाचे स्वरुप आहे. विराट कोहलीने मुलीचे नाव वामिका ठेवल्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले. डोमेन नेम देणारी GoDaddy वेब होस्टिंग कंपनीकडे वामिका कोहलीच्या नावाला प्रचंड मागणी आली आहे. जर कोणाला हे डोमेन नेम हवे असेल तर त्याला त्यासाठी 8 कोटींपेक्षा जास्त रक्कम द्यावी लागणार आहे. अमेरिकन डॉलरमध्ये ही रक्कम 1 मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे.

काय असते डोमेन नेम

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

डोमेन नेम इंटरनेटवर एखादी वेबसाइट किंवा ब्लॉगची ओळख करुन देते. वेबसाईटला ओळखण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे नाव दिले जाते, त्यालाच डोमेन नेम असे म्हणतात. इंटरनेट वापरकर्ते ब्राउझरच्या URL बारमध्ये डोमेन नाव टाईप करतात, आणि त्या साईटवर येतात. डोमेन सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या वेबसाईटवर जाऊन घेता येते. त्यात GoDaddy, Namecheap, BigRock अशा अनेक कंपन्या आहेत.

रॉयल चँलेंजर्स बेंगळुरुचा संघ आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये गेला होता. शेवटचे सहा सामने जिंकून RCB ने टॉप-4 मध्ये स्थान मिळवले होते. परंतु एलिमिनेटर सामन्यात विराट कोहलीच्या संघाचा चार गडीने पराभव झाला. विराटने आयपीएलमधील 15 सामन्यात 61.75 च्या सरासरीने 741 धावा केल्या.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन