पक्ष प्रवेशातच वादळ काँग्रेस, उबाठा माजी नगरसेवकांचा प्रवेश; मंत्री महोदयांसमोर कार्यकर्ते भिडले बंदोबस्त तैनात

0

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये राजकीय पटलावर घडामोडींनी वेग घेतला आहे. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळे रंगले. गुरूवारी काँग्रेसचे शाहु खैरे, मनसेचे दिनकर पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे विनायक पांडे यांच्यासह इतरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपकडून महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक निष्ठावान कार्यकर्त्यांनी या पक्ष प्रवेश सोहळ्यास विरोध दर्शविला. इच्छुकांकडून होणारी घोषणाबाजी आणि गोंधळ पाहता भारतीय जनता पक्ष कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी नगरसेवक दिनकर पाटील, त्यांचा मुलगा अमोल पाटील, माजी नगरसेविका लता पाटील, कॉग्रेसचे शाहु खैरे, माजी महापाैर यतीन वाघ, काँग्रेसचे शाहु खैरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

दरम्यान, काँग्रेस आणि उध्दव ठाकरे गटातील माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे समजल्यानंतर भाजपच्या महापालिका निवडणूक प्रमुख आमदार देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला. आमदार फरांदे यांनी समाज माध्यमातून या पक्ष प्रवेशाला विरोध केला. हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी आहे. मी महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख असतानाही या पक्ष प्रवेशाविषयी कुठलीही विचारणा माझ्याकडे करण्यात आली नाही, असे आमदार फरांदे यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, भाजपमध्ये दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या मंडळींमुळे आपल्यावर अन्याय होईल, या साशंकतेने प्रवेश सोहळा रंगण्याआधी भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी विरोध दर्शवित जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे भाजपमधील गटबाजी समोर आली.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!

निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात असून आयारामांना संधी दिली जात आहे. याविषयी गणेश मोरे यांनी, पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे नमूद करतााच विरोधकांशी संघर्ष करून आज इथपर्यंत आलो. मला उमेदवारीचे संकेत मिळाले आहेत. पक्ष प्रचाराला सुरूवात करा, असे सांगण्यात आले. ज्या लोकांचा प्रवेश होतो, त्यासाठी झारीतील शुक्राचार्य कोण हे समजेल. आमदार फरांदे जी भूमिका घेतील ती मान्य राहिल, असे त्यांनी सांगितले.

इच्छुकांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, असे आश्वासन भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिले. पक्ष एकसंध असून मतभेद असु शकतात. मनभेद नाही. मतभेद प्रत्येक पक्षात असतात. प्रवेश होतील, असे स्पष्ट केले. दरम्यान, भाजप कार्यालयाजवळ होणारी गर्दी पाहता. राज्य राखीव दलाची तसेच भद्रकाली सह अन्य ठिकाणाहून जादा पोलीस कुमक मागवण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. भाजप पक्ष कार्यालयाकडे जाणारे रस्ते हे बंद करण्यात आले होते.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट

दरम्यान, पक्ष प्रवेश सोहळ्याआधी गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भूमिका स्पष्ट केली. यानंतर पक्ष कार्यालयात जात असतांना पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांचे समर्थक आणि या प्रवेशा विरोध करणारे भाजप कार्यकर्ते आमने सामने आले. गर्दी जास्त असल्याने पोलीस, सुरक्षारक्षकांसह महाजन यांना पक्ष कार्यालय गाठण्यासाठी कसरत करावी लागली.