बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

0

कोथरूड विधानसभा मतदारसंघ मोठ्या अभिमानाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘बालेकिल्ला’ असल्याचे सांगितले जात असले तरी सुद्धा सत्तेचा सर्वाधिक लाभ उपभोगलेल्या या मतदारसंघात ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ धोरण अवलंबले आहे. या मतदारसंघातील पदे भोगणाऱ्या नेत्यांनी बालेकिल्ला अबाधित राखण्यासाठी प्रत्येक प्रभागातील किमान १ किंवा २ चेहरे स्थानिक स्वराज्य संस्था (पुणे महापालिका निवडणूक)च्या निमित्ताने नियोजन केले असल्याची जाणीव सध्याच्या घडामोडीवरून जाणवत आहे. पुणे शहरातील सर्वाधिक पक्की बांधणी (सर्व सेलचे पदाधिकारी, यादी प्रमुख, सर्वाधिक पदाधिकारी) केली आहे. तरीही स्थानिक पातळीवर पक्षाबाबत जी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे त्यामुळे निर्माण मोठा धोका जाणत्या नेतृत्वाने हेरला असून प्रसंगी नाराजी झाली तरीसुद्धा ‘चेहरा’बदल ही नवी रणनीती (निवडणूक सर्व्हे) अटळ बनली आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने असलेल्या ६ (३ पूर्ण अन् 3 अंशत:) प्रभागातील आपले प्राबल्य कायम ठेवण्यासाठी खूप मोठे धोरणात्मक निर्णय घेतले असून विरोधातील प्रभावी पॅनल प्रमुखालाच भाजपवासी करून विरोधकांना नामोहरण करण्याचे धोरण आखले आहे. पुणे महापालिकेच्या 2017 निवडणुका पार पाडल्यानंतर ‘मोघम’नजरेला कोथरूड हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला वाटत असला तरी या मतदारसंघातून लोकसभा आणि विधानसभेवर विजयी झालेल्या उमेदवारालाच या मतदारसंघाची ‘नाळ’ कळली असून प्राबल्य मतदार याद्यांवर उतरवण्यास किती कसब (दाम, यंत्रणा,पदाधिकारी) लागते याची प्रचिती आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका दोन्ही नेत्यांनी यशस्वी केले असल्या तरी पुन्हा पुणे महापालिका सर करण्यासाठी असलेल्या मर्यादा लक्षात घेऊन ही रणनीती आखण्यात येत आहे. लोकसभा आणि विधानसभे प्रमाणे स्वतंत्र यंत्रणा सक्रियता शक्य नसल्यानेच चेहरा बदल हे धोरण प्रकर्षाने राबवण्याची नियोजन सुरू झाले आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघाची स्थिती सविस्तर- 

प्रभाग क्रमांक ९ : सुस बाणेर पाषाण

या प्रभागात सुस, म्हाळुंगे ही नव्याने समाविष्ट झालेली गावे आहेत. या प्रभागात अ -अनुसूचित जमाती महिला, ब- OBC सर्वसाधारण, क-सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण असून विद्यमान भारतीय जनता पक्षाचे चार माजी नगरसेवकांपैकी एका उमेदवाराची संधी आरक्षणांनी हुकलेली आहे. अमोल बालवडकर, ज्योती गणेश कळमकर, स्वप्नाली प्रल्हाद सायकर भाजपाचे नगरसेवक असले तरीसुद्धा ओबीसी प्रवर्गातून संधी कोणाला अन् विरोधकांनी स्थानिक बाहुबली चेहरे एकत्र केल्यामुळे नवी समस्या निर्माण झाली आहे. महापालिकेत संधी मिळाल्यापासून सुरू असलेल्या ‘इव्हेंट’ च्या भरोश्यावर ‘मुंबई’वारीची स्वप्न पाहणारा चेहरा अन् करेल अन ‘ठेविली अनंते तैसेची रहावे’चे अशी भूमिका घेणारे दोन चेहरे नव्या रचनेमध्ये भारतीय जनता पक्षाला यश देतील याची खात्री वरिष्ठांनाच वाटत नाही. त्यामुळे याही प्रभागात 2 चेहरे बदल करण्याचे नियोजन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाकडे स्वतःच्या कोट्यात लहू बालवडकर, प्रकाश बालवडकर, शिवम बालवडकर, विशाल गांधीले, निलेश निम्हण, सचिन पाषाणकर, रोहन कोकाटे, सचिन दळवी, शिवम सुतार, राहुल कोकाटे तयार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत सुद्धा बाणेरचे माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी प्रमोद निम्हण, बालम सुतार, पूनम विधाते , राहुल बालवडकर, सागर बालवडकर, समीर चांदेरे, मनोज बालवडकर यांच्या साथीने तगडी लढत देण्याचे नियोजन केले आहे. स्थानिक नेतृत्व काँग्रेसचा निष्ठावान आणि दबंग चेहरा माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांनीही भारतीय जनता पक्षाचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे आयोजन केले असून त्यांच्या साथीला सुद्धा बाणेर पाषाण बालेवाडी सुस म्हाळुंगे भागातील जयेश मुरकुटे, संदीप बालवडकर, योगेश सुतार, जीवन चाकणकर, दत्ता जाधव, मंगेश निम्हण, ओम बांगर, स्नेहल बांदल, दिलीप मुरकुटे, संजय निम्हण, नितीन चांदेरे, अशोक दळवी, महेश सुतार, बाळासाहेब भांडे, अनिकेत मुरकुटे, शिवम दळवी, सुहास निम्हण, पांडुरंगमामा सुतार असे लक्षणीय चेहरे आहेत.

प्रभाग क्रमांक १० बावधन- भुसारी कॉलनी

या प्रभागात बावधन बुद्रुक आणि बावधन खुर्द ही दोन्ही गावे एकत्र केलीत यात डावी आणि उजवी भुसारी कॉलनी घेतली असली तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य असलेल्या परमहंस नगर भाग वगळण्यात आला आहे. आरक्षण सोडतीमध्ये अ- OBC सर्वसाधारण, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण असे सर्वांना सोयीचे आरक्षण या प्रभागात असले तरीसुद्धा प्रभाग रचनेत झालेला बदल हा या प्रभागात चेहरे बदल होणार याची जाणीव करून देत आहे. भाजपचे माजी नगरसेवक किरण दगडे (भोर, वेल्हा, मुळशी अपक्ष नशीब आजमावलेले), दिलीप वेडेपाटील(विधानसभेसाठी टोकाचे आग्रही), यांची आकांक्षापूर्ती यावेळी उमेदवारीत मोलाची भूमिका निभावणार आहे. अल्पना वर्पे, श्रद्धा प्रभुणे(हक्काचा भाग वेगळ्या प्रभागाला जोडण्यात आला आहे) यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या भागातील भाजपाचे गोरख दगडे, राजाभाऊ जोरी, वैभव मुरकुटे, धनंजय दगडे, गणेश कोकाटे, समीर जोरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी ‘बंडखोर आवरा कार्यकर्ते सावरा’ अशी भूमिका घेतली आहे. 

अधिक वाचा  पुणे भाजपच्या दुटप्पी भूमिकेने शिवसेनेपुढे प्रश्नचिन्ह?; पदरात तोकड्याच जागा अन् त्याही एकदम कडक पाषाण

पारंपारिक विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या वतीनेही माझी सभागृहनेते बंडूशेठ केमसे, कुणाल वेडे, जयश्री मारणे, सूर्यकांत भुंडे, दीपक दगडे, सिताराम तोंडे यांनी पक्की बांधणी केली आहे. त्यांच्या जोडीला काँग्रेसचे विकास गुरव, अशोक लोणारे, किशोर मारणे, किरण अडागळे सुद्धा भाजपच्या विरोधात उभे आहेत. ठाकरे बंधूंचा प्रभाव असलेला प्रभाग म्हणून या प्रभागाकडे पाहिले जात असून या प्रभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला जनमत असल्याची प्रचिती दोन वेळा झाली आहे. आजपर्यंत या भागातून राजाभाऊ गोरडे, पुष्पाताई कनोजिया, जयश्री मारणे यांनी नगरसेवक म्हणून काम केले आहे. सध्या राजाभाऊ गोरडे, राजेंद्र वेडे, प्रशांत कनोजिया, रमेश उभे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

प्रभाग क्रमांक: ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अत्यंत मानाचा असलेला परंतु विरोधकांच्या ताब्यात कायम सुखावलेला प्रभाग म्हणून या प्रभागाकडे पाहिले जाते. अत्यंत प्रयत्न करूनही मतांच्या कौलामध्ये ताब्यात नसलेला प्रभाग सर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने वेगळी रणनीती आखली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य कायम राहो यासाठी या प्रभागातील महत्त्वाच्या दोन झोपडपट्ट्या वगळण्याचं पहिलं काम करण्यात आला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठे आणि सातत्यपूर्ण वाटप हा प्रभाग सर करण्याचे हेतूने गेली पाच ते सहा वर्षांपासून सुरू आहे. शहरातील अन्य प्रभागाप्रमाणे विद्यमान नगरसेवकांना भाजपवाशी करून विजय साजरा करण्याचे नियोजन केले. अ OBC सर्वसाधारण, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण ही गणिते लढत बालेकिल्लातील भाजपा कशी लढते यावरती या मतदारसंघाची रणनीती अवलंबून आहे.

माजी नगरसेवक म्हणून दीपक मानकर, रामचंद्र(चंदूशेठ) कदम यांचा बालेकिल्ला म्हणून या प्रभागाची कायमच ओळख आहे सध्या भारतीय जनता पक्षाची ताकद वाढत आहे असे बोलले जात असले तरीसुद्धा ही जोडगोळी फोडल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला विजय मिळणार नाही याची जाणीव पक्ष नेतृत्वालाही आहे. त्याचाच भाग म्हणून माजी नगरसेविका वैशाली मराठे यांच्या हाती शिवधनुष्य देऊन ‘हाता’ची ताकद कमी करण्याची खेळी खेळण्यात आली आहे. महायुतीकडे यामुळे छाया मारणे यांच्या साथीला एक भिडू मिळाला असला तरी त्यांच्यापुढे या प्रभागातून भाजपामध्ये सक्रिय असलेल्या श्रीधर मोहोळ, अश्विनी जाधव, नंदकुमार गोसावी, डॉ. संदीप बुटाला, नितीन शिंदे, अभिजित राऊत, दिलीप उंबरकर, संतोष अमराळे, दत्ता भगत, संदीप मोरे, अनिता तलाठी, स्वाती मोहोळ, रणजीत हरपुडे यांची अडसर भारतीय जनता पक्ष कशी दूर करतो यावर विजयाची गणिते अवलंबून आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेही गणेश माथवड, दीपक मानकर, हर्षवर्धन मानकर, तृप्ती शिंदे, नवनाथ खिलारे, दत्तात्रय गायकवाड, संतोष ढोक, सचिन यादव अशी फौज असून आज पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मित्रत्वाने हा प्रभाग विजय करण्याचे लक्ष साध्य केले आहे. नव्या राजकीय गणितामुळे या भागात प्रभावी असलेली काँग्रेस विजय करण्यासाठी कोणती रणनीती रामचंद्र कदम हे (वैशाली मराठे साथीला नसताना) ‘नयना’मध्ये आनंदाश्रू कसे घडवणार आहेत हेच गुपित असल्यामुळे सर्व रणनीती अधांतरी आहे. या प्रभागातील दोन जागेवर पूर्वी शिवसेना एकत्र विजयी झालेली असल्याने त्यांचेही मनसूभे सर करून या भागामध्ये लढती कशा होतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. जयदीप पडवळ, अनिल घोलप, सविता मते, दिलीप गायकवाड, पुरुषोत्तम विटेकर, गणेश शिंदे, किरण उभे, साधू धुमाळ, सागर भगत, रामदास केदारी, हरीभाऊ सणस या कार्यकर्त्यांनी सुद्धा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

प्रभाग क्रमांक २९ डेक्कन जिमखाना हॅपी काॅलनी

भारतीय जनता पक्षासाठी सहज सुलभ प्रभाग रचना अशी ओळख भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली असली तरी सुद्धा नव्या प्रभाग रचनेमध्ये वाढलेली झोपडपट्टीची संख्या आणि इच्छुकांची प्रचंड रीघ हीच खरी भारतीय जनता पक्षासाठी मोठी अडसर आहे. कदाचित पुणे शहरातील सर्वाधिक इच्छुक म्हणून या प्रभागाची ओळख झाली तर नवल वाटणे अवघड नाही. या मतदारसंघातील मतदार हे भारतीय जनता पक्षाचे पक्के अशी धारणा झाल्याने विरोधकांकडे असलेले निवडक चेहरे(व्यक्तिगत संबंधाच्या भरोशावर) बदलत्या प्रभाग रचनेचा फायदा घेऊन चमत्कारही घडवू शकतात. प्रभागात अ OBC सर्वसाधारण, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण आरक्षणासाठी या प्रभागात प्रत्येक ठिकाणी दोन आकडी इच्छुकांची संख्या पोचली आहे. भाजपा माजी नगरसेवक दिपक पोटे, जयंत भावे, मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्त्रबुद्धे यांची नावे चर्चेत असली तरी सुद्धा प्रत्येकाची व्यक्तीगत काही प्रकरणे हेतूत:हा वरिष्ठांपर्यंत पोहोचल्याने कोणीही खात्री देऊ शकत नसलेला प्रभाग म्हणून या प्रभागाची ओळख निर्माण झाली आहे. भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून माजी विरोधी पक्षनेते ज्येष्ठ मार्गदर्शक उज्वल केसकर, शिवाजी शेळके, अमोल डांगे, रमा डांगे, प्रताप चोरगे, प्रशांत हरसुले, शिरीष भुजबळ, मंदार बलकवडे, गायत्री लांडे, नितीन आपटे, प्राची बगाटे, कुलदीप साळवेकर, हर्षदा फरांदे, गौरी करंजकर, उज्वल केसकर, केतकी कुलकर्णी, गिरीश खत्री, दीपक पवार, रामदास गावडे, शतनुं खिलारे, पुनीत जोशी, नितीन आपटे, सुनील पांडे, अपर्णा लोणारे, रवी आठवले, चित्रसेन खिलारे काम करत असले तरीसुद्धा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या किरण साळी, राजेश पळसकर, नितीन पवार, प्रशांत कदम, भिलारे, अजित ढोकळे यांनाही संधी मिळण्याची अपेक्षा वाटत आहे.

या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असला तरी सुद्धा आपल्या विचाराची धारा पक्की करण्यासाठी ‘कार्यदीप’तेवत ठेवणारे राम बोरकर, अनिल माझिरे, गजानन थरकुडे, प्रशांत बधे, शिवा मंत्री, भगवान कडू, संदीप मोकाटे, आण्णा गोसावी, गोविंद थरकुडे, यांना नव्या प्रभाग रचनेमुळे (मध्यम लोकवस्ती प्राबल्य) आशा निर्माण झाल्या आहेत. हीच योग्य वेळ परिवर्तनाची या उमेदवाराने या सर्व कार्यकर्त्यांनी समविचारी असलेल्या उमेश कंधारे, कृष्णा नाकते, राजाभाऊ साठे, सुरेखा होले, रुपाली मगर, वैभव दिघे, राम बाटुगे, अनिल राणे, गणेश शेडगे, राजेश शिगवण, मनीष अंतुरकर, धनश्री सचिन कराळे, मंदार खरे, अशोक दळवी, संजय बलकवडे, शिवा पाडाळे, सनी मानकर यांच्या साथीने विजयश्री खेचण्याचे नियोजन केले आहे.

प्रभाग क्रमांक ३० कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी

कोथरूड विधानसभा मतदारसंघात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आणि कायम वेगवेगळे कौल देणाऱ्या मतदारांचा भाग म्हणून या प्रभागाकडे पाहिले जाते. पुणे महापालिकेच्या इतिहासात कोणताही बदल न झालेला प्रभाग म्हणून या मतदार संघाची ओळख आहे. अति प्रचंड तयारी आणि गावकी-भावकीचे राजकारण जुळवत भारतीय जनता पक्षाने 3:1 अशी लढत यशस्वी केली होती. कर्वेनगर मध्ये भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला असला तरीसुद्धा पाच वर्ष हे विजयी ‘त्रिदेव’ संपूर्ण पाच वर्षाच्या काळात कसे राहिले एकमेकांकडे कसे पाहिले हे सर्व प्रभागात सर्वश्रुत आहे. याउलट विरोधात विजयी झालेल्या उमेदवाराने मात्र ‘लक्ष्मी’चा विचार न करता मतदारांना विकासाचे ‘स्वप्न’दाखवण्याचे काम केले आहे. एकीकडे त्रिदेव यांच्या तीन वेगवेगळ्या दिशा आणि सुरू असलेला दोघांचा प्रचार या भरोश्यावर भारतीय जनता पक्षाला या भागात विजय मिळवण्याचे सोय ‘स्वप्न’ मोठे धक्कादायक निर्णय घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. प्रभागातील विरोधातील उमेदवाराचा कामाचा वेग पाहता भारतीय जनता पक्षाचे विजयाचे स्वप्न-नील न व्हावे यासाठी भारतीय जनता पक्षाने नवी रणनीती आखली असून आज काही धक्कादायक प्रवेश होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?

प्रभागात रचनेत ज्याप्रमाणे बदल झाला नाही त्याप्रमाणे आरक्षणामध्ये ही कोणताच बदल न होता अ OBC सर्वसाधारण, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण राहिले आहे. प्रादेशिक दृष्ट्या हा प्रभाग सुद्धा भौगोलिक दृष्ट्या सरळ केला असला तरीसुद्धा मागील पाच वर्षे काळात सत्तेतील त्रिदेवांनी आखलेल्या रेखा आणि छोट्या-छोट्या रिचार्ज (घडामोडी)ने बलशाही होत असलेली ‘परिवर्तन’ लाट कोणाला लयाला घेऊन जाणार हे आगामी काळात पहावी लागणार आहे. माजी नगरसेवक पुत्र म्हणून स्वप्निल दुधाने, राजाभाऊ बराटे, वृषाली चौधरी, सुशील मेंगडे यांचे व्यक्तिगत कार्य सुरू असले तरीसुद्धा इतरांसाठी केलेली दलदल विजयाच्या धावपळीमध्ये अडसर ठरत आहे. भाजपकडे एकता विशाल रामदासी, विठ्ठल बराटे, महेश पवळे, मानसी सोमनाथ गुंड, कल्पना चव्हाण, विनोद मोहिते यांची दुसरी फळी तयार असली तरी सुद्धा संधी कोणाला यावरती भाजपाचे विजय अवलंबून असल्याने भारतीय जनता पक्षाने धक्कादायक निर्णय घेत आयात धोरण स्वीकारले असल्याची कुण-कुण सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गेली पाच वर्ष नागरिकांच्या संपर्कात राहत माणिक दुधाणे, आनंद उर्फ बंडूशेठ तांबे, रेश्मा संतोष बराटे, संगीता संजय बराटे, मोहित विलास बराटे, कुमार बराटे यांनी प्रविण आखत रणनीती आखली आहे. त्यातच काँग्रेसचा एकमेव भक्कम चेहरा विजय खळदकर अजितदादा यांच्या हाताला लागल्यामुळे या प्रभागामध्ये विरोधकांची रणनीती ‘तेजल’ झाली असली तरी सुद्धा पुणे शहरात ‘नव्याने उदय झालेल्या दोन्ही राष्ट्रवादी एक’चा सर्वाधिक फटका याच प्रभागात पडणार आहे. नव्या राजकीय गणितामुळे या भागात काम करणाऱ्या अजय भुवड, दिनेश बराटे, वैशाली दिघे, सचिन विप्र, आनंद पाटील, शैलेश जोशी, अशोक कदम, संतोष वाघमारे, गोरख भालेकर, विरेश शितोळे, शिंदे, विष्णुपंत सरगर, पल्लवी किशोर शेडगे, सचिन फोलाने, प्रणव थोरात, अनिकेत जवळकर, श्वेता शिंदे, देवेंद्र सुतार या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची मात्र अडचण झाली आहे.

प्रभाग क्रमांक ३१ मयूर काॅलनी कोथरूड 

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असले तरीसुद्धा ‘तुल्यबळ’ चेहरे हा अभाव भारतीय जनता पक्षासाठी चर्चेचा विषय असतानाच माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ला भाजपमध्ये घेण्यात पक्षाला यश आल्याने काही प्रमाणात भाजपाचही टेन्शन गेलं आहे. या प्रभागामध्ये अ OBC सर्वसाधारण, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण सर्वांना सोयीचे असे आरक्षण आणि या प्रभागातही भौगोलिक सलगता आहे. माजी नगरसेवक म्हणून पृथ्वीराज सुतार, मुरलीधर मोहोळ(सध्या केंद्रीय राज्यमंत्री), वासंती जाधव, हर्षाली माथवड यांच्या कामाची तुलना कायमच ‘तीन पेक्षा एक सरस’ अशी करण्यात आल्याने भारतीय जनता पक्षासाठी चेहऱ्याचा अभाव प्रकर्षाने जाणवत होता. भाजपाकडून शाम देशपांडे, शिरीष भुजबळ, मोनिकाताई मोहोळ, नवनाथ जाधव, गिरीष भेलके, अजित जगताप, नंदकुमार गोसावी, निलेश कोंढाळकर, दुष्यंत मोहोळ, कांचनताई कुंबरे, माजी नगरसेविका श्रद्धा प्रभुणे, अमित तोरडमल कार्यकर्त्यांची तगडी फौज तयार करण्यात आली असली तरी सुद्धा संधी नक्की कोणाला आणि नाराज महाराज कसे शांत करायचे हाच यक्ष प्रश्न या प्रभागात निर्माण झाला आहे.

पारंपरिक मित्र शिवसेना या प्रभागांमध्ये बाहुबली असल्याने भारतीय जनता पक्षाने मुख्य चेहरा भाजपवासी करून हा प्रभाग पुन्हा मिळवणे किती गरजेचे आहे याची जाणीव करून दिली आहे. विधानसभा इच्छुक तीन तगडे उमेदवार अशी भक्कम लढत तोडण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले तरीही शिवसेना (उबाठा) कडून योगेश मोकाटे, उमेश भेलके, मनसेकडून ॲड किशोर शिंदे, संजय काळे यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडून ‘तोडीसतोड’ लढत शक्य आहे. राष्ट्रवादीतर्फे गिरीश गुरनानी, काँग्रेसकडून महेश विचारे, राज जाधव, ॲड. कांचन शिंदे, उदय भेलके, देवेंद्र सुतार, नितीन पवार, किरण मारणेही आपले नशीब आजमावत आहेत.