पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने इतर पक्षातील ‘बाहुबली’ पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्याचे धोरण सुरुच ठेवले आहे. विरोधातील ‘प्रभावी पॅनल’ला लक्ष करत भारतीय जनता पक्षाने प्रवेशाचे धोरण अवलंबून अनुक्रमे कोथरूड वडगाव शेरी मतदारसंघातील २ दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या दोन माजी नगरसेवकांना प्रवेश देण्याचा कार्यक्रम अजूनही सुरू असून भारतीय जनता पक्ष व अजित पवार यांच्या भूमिकेवर प्रचंड टीका करणाऱ्या प्रशांत जगताप यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी आणि शिवाजीनगर मतदार संघातील काँग्रेसचे बाहुबली नेतृत्व अशा २ प्रमुख पदाधिकारी भाजपच्या गळाला लावले आहेत.यामध्ये माजी राज्यमंत्री यांच्या नावाची जोरदार चर्चा असून मुलासाठी (प्रभाग क्रमांक 18 प्रशांतदादांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी) ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.






काँग्रेसमधील दुसरे पदाधिकारी देखील भाजपची वाट धरणार आहेत. हा पदाधिकारी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील असून भाजपच्या स्थानिक आमदारांचा या प्रवेशाला विरोध आहे. महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याचे उदिष्ट भाजपने ठेवले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बीडकर यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र हा विरोध डावलून हा पक्ष प्रवेश केला जाणार असल्याची माहिती आहे. ज्या प्रभागांत भाजपची ताकद कमी तेथील इतर पदाधिकाऱ्यांचा तसेच माजी नगरसेवकांचा प्रवेश भाजपमध्ये घडवून आणून त्यांना उमेदवारीचे नियोजन आहे. काँग्रेसच्या या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश व्हावा, यासाठी भाजपचे पुणे शहरातील पदाधिकारी विशेष आग्रही आहेत. त्यामुळे हा पक्ष प्रवेश पार पडत आहे.
महापालिकेची उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ सुरू असून उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशीच तीन हजार तर दुसऱ्या दिवशी साडेतीन हजार अर्ज इच्छूक उमेदवार घेऊन गेले आहेत. सर्व पक्षप्रवेश त्वरित करून घेण्याचे नियोजन भारतीय जनता पक्षाने केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधील माजी नगरसेवक, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासह शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेवकांना भाजपने पक्षात प्रवेश दिलेले आहेत. गेल्या आठवड्यात भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत मुंबईत हे पक्ष प्रवेश पार पडले होते. या पक्षप्रवेशामध्ये आता काँग्रेसची भर पडणार आहे.













