क्रिकेटच्या मैदानातील मिलिंदचा ‘तो’ शेवटचा सामना ठरला, पुण्यातील मन सुन्न करणारी घटना

0

क्रिकेट खेळताना मैदानातच तरुणांचा मृत्यू होण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. क्रिकेट खेळताना चेंडू लागून किंवा दोन टीमच्या हाणामारीमध्ये एखाद्या खेळाडूचा मृत्यू होतो. पण सध्या मैदानात खेळतानाच हार्ट अटॅक येण्याचा प्रमाण वाढलं आहे. पिंपरी-चिंचवडमधील सांगवीच्या पीडब्ल्यूडी मैदानावर क्रिकेट खेळताना एका 40 वर्षीय तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मिलिंद भोंडवे असं मरण पावलेल्या तरुणाचं नाव आहे. मिलिंद गोलंदाजी करता, करता अचानक खाली कोसळला. ही घटना दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली.

सांगवीच्या पीडब्ल्यूडी मैदानावर पाच दिवसीय क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. आज स्पर्धेचा तिसरा दिवस होता. त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली. दुपारी मिलिंद यांच्या टीमचा क्रिकेट सामना होता, तो स्वतः गोलंदाजी करत होता. गोलंदाजी करताना त्याला अचानक चक्कर आली व तो मैदानातच कोसळला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

कोणालाच असं वाटलं नव्हतं, की….

इतर सहकारी खेळाडूंनी धावत येऊन त्यांना नेमकं काय झालं हे पाहिलं. मिलिंद यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांचा मृत्यू हा हृदविकाराच्या झटक्याने झाल्याचं समोर आलं आहे. मिलिंद हे उत्तम क्रिकेट खेळायचे. त्यांचा हा शेवटचा क्रिकेट सामना ठरेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. मिलिंद भोंडवे हे मूळचे मावळ तालुक्यातील दारुब्रे येथील राहणारे आहेत. या घटनेमुळे भोंडवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.