वैष्णवी हगवणे हिच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने आंदोलन

0
1

हुंड्यासाठी प्रचंड मानसिक व शारीरिक छळ करत हत्या झालेल्या स्व.वैष्णवी हगवणे यांना न्याय मिळाला पाहिजे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व चौकात गृह विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी “वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे” , “नराधम राजेंद्र हगवणेला अटक करा” , “जागे व्हा… जागे व्हा.. गृहमंत्री जागे व्हा” ,”नराधमांना फाशीची फाशीची शिक्षा द्या” अशा घोषणांनी हा परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “21व्या शतकाकडे आपण वाटचाल करत असताना आजही हुंड्यासाठी निष्पाप मुलींचा बळी घेतला जातो. अश्या घटनेमुळे समाजातील इतर कुटुंबांवर देखील गंभीर परिणाम झाला आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेत वैष्णवीला पूर्णपणे न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलो आहोत. या आंदोलनात आमच्या प्रमुख मागण्या आहेत की, महायुतीचा पदाधिकारी असल्याने या घटनेतील आरोपी राजेंद्र हगवणेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, याबाबत पुणे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का…? ती सविस्तर चौकशी करत राजेंद्र हगवणे ला अटक करण्यात यावी.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

या घटनेतील मास्टरमाइंड निलेश चव्हाणला अटक करण्यात यावी. हगवणे कुटुंबातील सर्व सदस्यांवर खून, अपहरण, संघटित गुन्हेगारी , ठरवून कट करणे या आरोपांखाली मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच या सर्व प्रकरणात प्रचंड प्रशासकीय दिरंगाई झाल्याने गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांची माफी मागावी. त्याशिवाय या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. राज्यात नवविवाहितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार बद्दल कठोरात कठोर कायदे करण्यात यावे ज्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटना करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही. वैष्णवी हगवणे या नवविवाहितेला संपूर्ण न्याय मिळेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या करण्याचा पूर्णपणे पाठपुरावा करणार आहे” ,असे देखील प्रशांत जगताप यावेळी म्हणाले.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

या आंदोलन प्रसंगी प्रशांत जगताप, रवींद्र मालवदकर, स्वाती पोकले, भारती शेवाले, श्रीकांत पाटील, श्रद्धा जाधव, राजश्री पाटील, ऋतुजा देशमुख, केतन ओरसे, विक्रम जाधव, पूजा काटकर, पायल चव्हाण, रमीज़ सैय्यद, उदय महाले, सानिया झुंजारराव यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.