पुणे : भारतातील पहिला नोंदणीकृत लघु आणि मध्यम आकाराचा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट असलेल्या प्रॉपर्टी शेअर इनव्हेस्टेंट ट्रस्ट (“पीएसआयटी”) ने प्रॉपशेअर प्लॅटिना या आपल्या योजनेसाठी ड्राफ्ट ट्रस्ट ऑफर तसेच ड्राफ्ट स्कीम ऑफरसाठी आपले प्रस्ताव दाखल केले आहेत, पीएसआयटी अंतर्गत ही पहिली योजना असून त्याद्वारे एकूण 353 कोटी रुपयांचा निधी उभारला जाणार आहे.
बंगळूरच्या आऊटर रिंग रोडवर (ओरआरआर) स्थित असलेली लीड गोल्ड ऑफिस इमारतरुपी टेक प्लॅटिना हा प्रॉपशेअर प्लॅटिनाचा प्रतिष्ठीत प्रकल्प असून त्यात तब्बल 246,935 चौरस फूट कार्यालयीन क्षेत्रफळ आहे. हा संपूर्ण प्रकल्प अमेरिका स्थित टेक कंपनीला नऊ वर्षाच्या पूर्णतः भाडेतत्वावर देण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी वर्षाला 4.6 भार असा सरासरी लॉकइन कालावधी आणि दर तीन वर्षांनी भाड्यात 15 टक्के वाढ अशा अटी या भाडेकरारात आहेत. या योजनेतील गुंतवणूकदारांना वित्तीय वर्ष 26 साठी 9 टक्के वितरीत उत्पन्नाचा प्रस्ताव देत आहे.
जोन्स लँग लासेल यांनी केलेल्या संशोधनानुसार आऊटर रिंग रोड हे बंगळुरूमधील सर्वात मोठे ऑफिस मार्केट असून एकूण ऑफिस जागांमध्ये त्याचा हिस्सा ३४% आहे. या भागात ॲडोब, ॲमेझॉन, गुगल, सॅमसंग, सिस्को, जेपी मॉर्गन, मॉर्गन स्टॅनले, वेल्स फार्गो यासह विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. त्याचबरोबर द प्रेस्टीज ग्रुपने विकसित केलेली मालमत्ता तेथे उभारल्या जात असलेल्या मेट्रो रेल्वेस्थानकाजवळ आहे आणि हे स्टेशन ओआरआर परिसराला विमानतळाशी जोडणार आहे.
पहिल्या योजनेसाठी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर असलेल्या प्रॉपशेअर इन्व्हेस्टेंट मॅनेजर प्रायव्हेट लिमिटेड (“प्रॉपर्टी शेअर” किंवा “आयएम“) ने वित्तीय वर्ष 25 आणि 26 साठी सर्व वार्षिक व्यवस्थापन खर्च (गुंतवणूक व्यवस्थापन शुल्क आणि मालमत्ता व्यवस्थापन शुल्कासह) माफ करण्याचा निर्णय घेतला आहे आणि वित्तीय वर्ष 27 मध्ये 0.25 % नाममात्र शुल्क आकारले जाईल. तर वित्तीय वर्ष 28 पासून 0.30 % शुल्क आकारले जाणार आहे. प्रॉपर्टी शेअर योजनेचे किमान ५ % युनिट्स अथवा आयएमचे योगदान म्हणून या ऑफरमध्ये त्याच्या भांडवलातून 17.6 कोटी रुपये गुंतविले जाणार आहे. हा आयपीओ पूर्णपणे प्लॅटिना युनिट्सचा एक नवीन इश्यू असून त्यामध्ये विक्री घटकाची कोणतीही ऑफर समाविष्ट करण्यात आलेली नाही.
ऑफरची रक्कम प्रामुख्याने प्लॅटिना एसपीव्हीद्वारे प्रेस्टीज टेक प्लॅटिना मालमत्तेच्या संपादनासाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे आणि उर्वरित रक्कम कंपनीच्या सामान्य कामकाजासाठी वापरली जाणार आहे. म्हणाले प्रॉपर्टी शेअरचे संचालक कुणाल मोकतन (Kunal Moktan) म्हणाले, “ प्रॉपशेअर प्लॅटीना ही भारतातील पहिली स्मॉल अँड मीडियम रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (एसएम रिट) योजना सुरू करताना आम्हाला अभिमान वाटतो आणि ती सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. आमचा विश्वास आहे की, थेट लक्ष केंद्रित केलेल्या उत्पन्नधारित मालमत्तेमध्ये गुंतवणुक करणारे एसएम रिटचे हे प्रारुप उत्पन्न मिळवून देणाऱ्या रिअल इस्टेटच्या विश्वात प्रवेश करण्याची संधी प्रदान करते आहे आणि ती आतापर्यंत सार्वजनिक गुंतवणूकदारांसाठी कधीही उपलब्ध नव्हती.”
प्रॉपर्टी शेअरचे संचालक हाशीम खान म्हणाले, एसएम रिटस् सादर करून, नियामकाने सार्वजनिक गुंतवणूकदारांच्या विविध गटांकरिता नवीन मालमत्ता प्रकारांसाठी नियमांची चौकट सादर केलेली आहे. आमचा विश्वास आहे की, भारताची पहिली एसएम रिटस योजना असलेली प्रॉपशेअर प्लॅटिना गुंतवणुकदारांना 10 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या गुंतवणूकीआधारे ग्रेड ए प्री–लीज्ड व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करण्याची अनोखी संधी देते.”
ट्रस्टसाठी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर असलेल्या प्रॉपर्टी शेअरमध्ये अनुभवी तज्ज्ञांची टीम आहे. त्यामध्ये आघाडीच्या आयआय़टी आणि आयआयएममधून शिक्षण घेतलेल्या 44 तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यांना आघाडीच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत रिअल इस्टेट फंडांमध्ये संस्थात्मक गुंतवणुकीचा अनुभव आहे. प्रॉपर्टी शेअरचा 11 सदस्यांच्या वरिष्ठ गुंतवणूक चमूकडे भारतात व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा 62 वर्षांचा एकत्रित अनुभव आहे. (स्रोत: मसुदा योजना ऑफर दस्तऐवज) आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे या ऑफरचे एकमेव लीड मॅनेजर आहेत आणि सिरिल अमरचंद मंगलदास हे प्रॉपर्टी शेअर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचे भारतीय कायदेशीर सल्लागार आहेत तसेच प्रॉपशेअर प्लॅटिनासाठी गुंतवणूक व्यवस्थापकसुध्दा आहेत. तसेच केफिन टेक़्नॉलॉजीज लिमिटेड ही ऑफरची रजिस्ट्रार आहे. अॅक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेस लिमिटेड हे इश्यूसाठी विश्वस्त आहेत आणि प्रॉपशेअर इन्व्हेस्टमेंट मॅनेजर प्रायव्हेट लिमिटेड हे ऑफरसाठी गुंतवणूक व्यवस्थापक आहेत. सदर ऑफरचे युनिट्स बीएसई लिमिटेड (“बीएसई”) (“स्टॉक एक्सचेंज”) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
एसएम रिटसबाबत
एसएम रिटस् हा एक नवीन मालमत्ता वर्ग आहे जो सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने रिटस फ्रेमवर्कमध्ये 50-500 कोटी रुपयांदरम्यानच्या मालमत्तेसाठी उप–वर्ग म्हणून नियंत्रित केला आहे. 10 लाख रुपयांपर्यंत जास्त किमान लॉट आकार असलेलेरिटसप्रमाणेच, एसएम रिटस युनिट्स रिटसप्रमाणे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध करणे आवश्यक आहे . एसएम रिटला बांधकामाधीन मालमत्ता किंवा जमिनीत गुंतवणूक करण्याची परवानगी नाही आणि त्यांनी कमाईचा 95 टक्के भाग हा युनिटधारकांना वितरित करणे आवश्यक आहे.
प्रॉपर्टी शेअरबाबत
सिक्युरिटीज मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने मार्च 2024 मध्ये एसएम रिट नियमांना अधिसूचित केल्यानंतर एसएम रिट परवाना प्राप्त करणारी प्रॉपर्टी शेअर ही पहिली फर्म आहे. प्रॉपर्टी शेअरची मूळ कंपनी हाशिम खान आणि कुणाल मोक्तान यांनी 2015 मध्ये स्थापन केली होती. प्रॉपर्टी शेअरची सह–संस्थापना करण्यापूर्वी, कुणाल यानी भारतीय रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या द ब्लॅकस्टोन ग्रुप या ग्लोबल रिअल इस्टेट फंडमध्ये ७ वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलेले आहे. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (अहमदाबाद) येथून एमबीए केले आहे. हाशिम यांना प्रॉपर्टी शेअरमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा 8 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्याआधी मध्यपूर्वेतील मोठ्या समूहामध्ये विविध भूमिकांमध्ये काम केले होते. हाशिम यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कानपूर) मधून बीटेक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (अहमदाबाद) मधून एमबीए केलेले आहे.कंपनीच्या होल्डिंग कंपनीमध्ये सक्षम संचालक, दिग्गज गुंतवणूकदार आणि प्रस्थापित सल्लागार आहेत. यामध्ये सी बी भावे – सेबी आणि एनएसडीएलचे माजी अध्यक्ष, विकास ख्डलोया – एम्बसी रिटसचे माजी सीईओ, ब्लॅकस्टोन ग्रुपचे माजी एमडी, डिर्क व्हॅन क्वॉकबेके – बीनेक्टचे व्यवस्थापकीय भागीदार आणि हा सिंगापूर आधारित व्हेंचर फंड आहे, तसेच दीपक रामिनेदी – वेस्टब्रिज कॅपिटल येथील भागीदार, फेलिक्स कुना – के3 कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक, जर्मन फॅमिली ऑफिस आणि रोहित जैन – व्यवस्थापकीय भागीदार, प्रवेगा व्हेंचर्स यांचा समावेश आहे.