सिलिंडरचे दर वाढले ते विमान प्रवास महागणार, आजपासून कोणते नवीन नियम झाले लागू?

0

महिन्याच्या सुरुवातीबरोबरच अनेक मोठे बदल लागू झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर आणि आर्थिक नियोजनावर होणार आहे. यामध्ये यूपीआय पेमेंट, रेल्वे तिकीट बुकिंग, ऑनलाइन गेमिंग, व्याजदर आणि पेन्शन योजनांशी संबंधित अनेक नियमांचा समावेश आहे.

 LPG सिलेंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो

१ ऑक्टोबरपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो. दर महिन्याप्रमाणे यावेळीही तेल कंपन्या एलपीजी, सीएनजी आणि जेट फ्युएलच्या दरात बदल करतात. गेल्या काही महिन्यांत कंपन्यांनी केवळ व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल केला आहे, तर घरगुती सिलेंडरचे दर पूर्वीसारखेच आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये ८ एप्रिल २०२५ पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

UPI द्वारे एकावेळी ५ लाख रुपयांपर्यंत व्यवहार शक्य

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

आता UPI द्वारे एकावेळी ५ लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार आहे. पूर्वी ही मर्यादा फक्त १ लाख रुपये होती. या बदलामुळे रिअल इस्टेट, ई-कॉमर्स आणि व्यवसायाशी संबंधित मोठे व्यवहार करणे सोपे होईल. याशिवाय, आता UPI ऑटो-पे सुविधा देखील सुरू होईल. म्हणजेच सबस्क्रिप्शन, वीज-पाणी बिल किंवा इतर सेवांचे पेमेंट आपोआप निश्चित तारखेला होईल. प्रत्येक वेळी ऑटो-डेबिट होण्यापूर्वी तुम्हाला एक सूचना मिळेल आणि गरज पडल्यास तुम्ही ते बदलू किंवा रद्द करू शकता.

रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले

आता रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. नवीन नियमानुसार, जेव्हाही आरक्षण सुरू होईल, तेव्हा पहिल्या १५ मिनिटांत फक्त तेच लोक ऑनलाइन तिकीट बुक करू शकतील ज्यांचे आधार कार्ड व्हेरिफाईड असेल. हा नवीन नियम १ ऑक्टोबरपासून लागू होईल.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

ऑनलाइन गेम खेळण्यास किमान वय १८ वर्षे आवश्यक

आता सर्व ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म्सना MeitY कडून वैध परवाना घ्यावा लागेल. गेमिंग सुरक्षित आणि पारदर्शक बनवणे तसेच फसवणूक रोखणे हा याचा उद्देश आहे. तसेच, आता ऑनलाइन रिअल-मनी गेम खेळण्यासाठी किमान वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे.

RBI च्या धोरण समितीची चलनविषयक बैठक होणार

१ ऑक्टोबर रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत रेपो रेट आणि इतर आर्थिक निर्णयांची घोषणा केली जाईल. जर रेपो रेट कमी झाला, तर गृहकर्ज आणि कार कर्जाचे व्याजदर कमी होऊ शकतात, ज्यामुळे तुमचा मासिक EMI कमी होऊ शकतो.

स्पीड पोस्ट सेवेत बदल; शुल्क वाढ

टपाल विभागाने १ ऑक्टोबर २०२५ पासून स्पीड पोस्ट सेवेत बदल केले आहेत. आता काही भागांमध्ये पोस्ट पाठवण्याचे शुल्क वाढवण्यात आले आहे, तर काही ठिकाणी ते कमी करण्यात आले आहे. यासोबतच ओटीपीद्वारे सुरक्षित डिलिव्हरी, रिअल-टाइम ट्रॅकिंग, ऑनलाइन बुकिंग आणि पेमेंट, एसएमएस सूचना आणि युझर रजिस्ट्रेशन यांसारख्या नवीन सुविधाही सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना १०% आणि नवीन घाऊक ग्राहकांना ५% सूटही मिळेल.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

बँकांना ऑक्टोबर महिन्यात सुट्ट्याच सुट्या

ऑक्टोबरची सुरुवात दुर्गापूजेच्या सुट्टीने होईल आणि त्यानंतर महिनाभर महात्मा गांधी जयंती, दसरा, लक्ष्मी पूजा, महर्षी वाल्मिकी जयंती, करवा चौथ, दिवाळी यांसारखे मोठे सण येतील. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये बँकांना भरपूर सुट्ट्या असतील. म्हणून, बँकेत जाण्यापूर्वी आरबीआयने जारी केलेली सुट्ट्यांची यादी तपासणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमचा बँकेत जाऊन वेळ वाया जाणार नाही.