धाराशिव हादरलं ! ऑनलाईन जुगार कर्जबाजारी झाला; तरुणाने आधी पत्नी आणि मुलाला संपविले अन मग स्वत:ही…

0
2

ऑनलाईन रमीच्या आहारी जाऊन कर्जबाजारी झालेल्या युवकाने पत्नी आणि दोन वर्षांच्या चिमुकल्याला ठार करुन स्वत:ही जीवन संपविल्याची धक्कादायक घटन धाराशिवमध्ये घडली आहे. तरुणाच्या या धक्कादायक कृत्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील बावी गावात राहणाऱ्या लक्ष्मण मारुती जाधव (वय 29) याने आत्महत्या केली आहे त्याआधी त्याने आपल्या पत्नी आणि मुलाला संपविले. लक्ष्मण मारुती जाधव याला पत्ते खेळण्याचा नाद होता. तो ऑनलाईन रमी खेळायचा. ऑनलाईन रमीच्या नादात लक्ष्मणच्या डोक्यावर मोठे कर्ज झाले झाले होते. त्यामुळे लक्ष्मण जाधव हा प्रचंड नैराश्यात होता. याच नैराश्यातून त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

लक्ष्मण जाधव हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. त्याने तीन गावातील तेजस्विनीशी (वय 21) प्रेमविवाह केला होता. त्यांना दोन वर्षाचा मुलगा होता. गावकऱ्यांच्या माहितीनुसार लक्ष्मण याने कर्जबाजारीपणामुळे एक एकर जमीन तसेच गावातील प्लॉटिंगची जागा विकली होती. यानंतरही तो कर्जबाजारीपणातून सुटका झाली नाही. त्यामुळे तो तणावात होता.

दरम्यान लक्ष्मणने रविवारी रात्री पत्नी तेजस्विनी तसेच दोन वर्षाच्या मुलाला विष दिले त्यानंतर त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत तपास सुरु केला आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य