मस्सोजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचा मुलगा सैनिकी शाळेत शिकणार; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली जबाबदारी

0
1

मस्सोजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची अन्यायाविरुद्ध लढताना निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचा मुलगा विराज व पुतण्या सत्यजित देशमुख देखील ‘लढाऊ’ शिक्षण घेणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने त्यांना आठवी ते बारावीपर्यंत सैनिकी शाळेत मोफत शिक्षण मिळणार आहे. विराज व सत्यजित आणि संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी नुकतीच फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत भावनिक संवाद घडून आला आणि त्यातून एक अत्यंत संवेदनशील व दूरदृष्टीचा निर्णय झाला.

फडणवीस यांनी विराज आणि सत्यजित यांच्या आठवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत, त्यांच्या दोघांचेही शिक्षण सांगली जिल्ह्यातील रेठरे धरण येथील नामांकित एस. के. इंटरनॅशनल सैनिकी शाळा येथे व्यवस्था केलीआहे. न्याय मिळविण्यासाठी कायदेशीर लढा सुरु असतानाच, मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याने समाजात सकारात्मक उदाहरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आमदार अभिमन्यू पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला. यावेळी आमदार सदाभाऊ खोत हे देखील उपस्थित होते.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार