दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेनिस कोर्टचे २५ लक्ष निधी नूतनीकरण आणि अद्ययावतकरण नूतनीकरण सोहळा उत्साहात संपन्न!

0
1

पुणे महापालिकेमध्ये प्रशासक्रात सुरू झाल्यानंतरही आपल्या भागातील शासकीय सोयी सुविधा अद्यावत ठेवण्यासाठी कर्वेनगर भागातील माजी नगरसेविका लक्ष्मी वहिनी दुधाने यांच्या वतीने कायमच पाठपुरावा केला लोकांच्या करुरूपी पैशातून तयार करण्यात आलेल्या या सोयीसुविधा अद्यावत न ठेवल्यास त्याचे नुकसान होण्याची भीती लक्षात घेऊन वापरात ठेवण्यासाठी त्यांच्याकडून कायमच प्रयत्न केले जातात. पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता नसतानाही आपल्या कल्पक विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आदर्शवत काम करत लक्ष्मी वहिनी दुधाने यांनी कर्वेनगर मध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नागरी सुविधांसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा मिळवण्यासाठी फक्त पदाची अपेक्षा न करता लोक सेवार्थ आयुष्य व्यथित करण्याच्या हेतूनेच आजही दुधाने वहिनी प्रभागांमध्ये कार्यरत असल्याचे प्रतीत होत आहे. पुणे मनपाच्या वतीने कर्वेनगर भागामध्ये विकसित केलेल्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन सिंथेटीक टेनिस कोर्टचा ची निर्मिती करण्यात आली होती परंतु प्रशासक काळामध्ये याकडे दुर्लक्ष होत हा अत्यंत अत्यावशक प्रकल्प किरकोळ निधी अभावी बंद अवस्थेत जाण्याच्या मार्गावर असतानाच स्वप्निल दुधाने यांनी पुणे महापालिका प्रशासक आणि संबंधित विभागाकडे योग्य पाठपुरावा करत पूर्ववत नव्या तंत्रज्ञानाने युक्त असे नवीन कोर्ट तयार करण्यात आले. स्थानिक नागरिकांना याबाबत मोठे कुतूहल असतानाच त्याच उत्साहामध्ये संबंधित दोन सिंथेटीक कोर्टचा उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

आपल्या प्रभागातील आणि पर्यायाने शहरातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी आपण २०१७ साली लोकप्रतिनिधी या नात्याने पहिल्याच टर्ममध्ये पुणे मनपाच्या वतीने स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल विकसित केले आहे. या ठिकाणी सन २०१७ आणि सन २०२० साली विकसित केलेल्या दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेनिस कोर्टचाही समावेश असून या टेनिस कोर्टचे नूतनीकरण आणि अद्ययावतकरण होणे, काळाची गरज बनले होते. याचसाठी वेळोवेळी पाठपुरावा करत तब्बल २५ लक्ष रुपये निधी मंजूर करून आणत आपण या कामाचा शुभारंभ केला होता.

गेल्या आठ वर्षांपासून अनेक खेळाडूंनी या ठिकाणी सराव करत आपल्या पुणे शहराचा नावलौकिक वाढवला आहे. आज खेळाडूंच्याच शुभहस्ते नूतनीकरण सोहळा संपन्न होत असताना अनेक खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. गेल्या तब्बल चार दशकांपासून टेनिस खेळाडूंना प्रशिक्षण देणारे दत्तात्रय शिंदे आणि अनेक वर्षांपासून त्यांचा वारसा जपत खेळाडू या क्रिडा संकुलात घडवणारे प्रशिक्षक रोहित शिंदे उपस्थित होते. यावेळी सर्व क्रीडाप्रेमी आणि पालक वर्गाला आपल्या पाल्याला खेळातही प्राविण्य प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देत पुणे शहराला नवी ओळख निर्माण करून देण्यात योगदान द्यावे, अशी विनंती केली.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप