मोरया मित्र मंडळाच्या वतीने या वर्षी समाजातील दुर्लक्षीत आणि बाहेर फेकला गेलेला घटक अंध,अपंग व्यक्ती अशा अंध मुलांना स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी, त्यांच्या शिक्षणाचा,त्यांच पालन,पोषण,शिक्षण, लुई ब्रेल अंध कल्याणकारी संस्था करते या संस्थेतील काही अंध मुलांच्या हस्ते आरती करून ह्या संस्थेला मोरया मित्र मंडळाच्या वतीने चहा, नाश्ता, जेवन या साठी लागणारे किराणा साहित्य म्हणजे शिधा मोरया मित्र मंडळाच्या वतीने वाटप करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते.
अंध मुलांना किराणा साहित्य वारजे पोलीस स्टेशन वरीष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे आणि पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ अध्यक्ष विजय पारगे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी कांइगडे साहेब म्हणाले मोरया मित्र मंडळ हे सामाजिक काम करणारे मंडळ म्हणून ओळखले जाते. त्यांचा हा उपक्रम आदर्शवत आहे वर्गणी गोळा करून त्याचा असा चांगला व योग्य वापर करत आहात यांचा आनंद आहे.
यावेळी मोरया मित्र मंडळ संस्थापक केदार वसंत मारणे, अध्यक्ष अथर्व भरम, उपाध्यक्ष गणेश शिंदे, गणेश गायकवाड, शुभम कदम, अक्षय केसवड, विजय औजी, विनायक भरम, इतिहास संशोधक मंडळ अजिव सभासद मंगेशजी नवघणे , संभाजी दराडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मोरया मित्र मंडळाच्या वतीने बुद्धीच्या देवतेला विद्वत्तेची ‘आरास’ही सजावट म्हणून केली आहे.
बुद्धीच्या गणरायाला शालेय साहित्य भेट नको हारफुले प्रसाद!
किमान ,एक वही एक पेन करा प्रसादाच्या रूपात असे आवाहन मोरया मित्र मंडळ कर्वेनगर यांच्या वतीने करण्यात आले होते. ह्या उपक्रमाला नागरीकांकडुन खुप प्रतिसाद मिळत आहे. आलेल्या शालेय साहित्याची श्री गणेशाला आरास करुन अगळा वेगळा देखावा मंडळाने केला आहे.