रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

0
104

रोहित शर्माने तब्बल २० किलो वजन कमी केलं. पण रोहित शर्मानेहे २० किलो वजन कमी कसं केलं, ते आता समोर आलं आहे. प्रत्येक दिवशी दोन दोन तासांनी त्याच्यासाठी एक खास डाएट प्लॅन आखलेला होता. या दोन दोन तासांमध्ये रोहित शर्मा नेमकं काय काय खायचा, हे आता समोर आलं आहे. त्याचबरोबर कोणती गोष्टी रोहितसाठी सर्वात जास्त फायदेशीर ठरली, हेदेखील सर्वांना समजून घेता येऊ शकतं…..

सकाळी ७.०० वाजता.. (प्रथम न्याहरी)

रोहित पहिल्या न्याहरीला ६ भिजवलेले बदाम खायचा. त्यानंतर मोड आलेल्या कडधान्यांचे सॅलड आणि ताजा रस किंवा भाज्यांचा सूप प्यायचा.

सकाळी ९:३० वाजता (नाश्ता)

रोहित शर्मा हा सकाळच्या नाश्ता असा करायचा की, ज्यामधून जास्त उर्जा मिळू शकेल. रोहित त्यावेळी फळांसह ओटमील आणि एक ग्लास दूध यांचे सेवन करायचा.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

सकाळी ११:३० वाजता

नाश्ता आणि जेवण यांच्यामध्ये रोहित शर्माचा अजून एक डाएट ब्रेक असायचा. यामध्ये रोहित शर्मा हा दही, चिल्ला, नारळ पाणी हे डाएटमध्ये घ्यायचा.

दुपारी १:३० वाजता (जेवण)

कोणत्याही डाएटमध्ये दुपारचे जेवण सर्वात महत्वाचे समजले जाते. कारण ते संपूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन बॅलन्स करत असते. रोहित शर्मा दुपारच्या जेवणात वरण आणि भारत याबरोबर एक खास पदार्थ घ्यायचा आणि तो पदार्थ सर्वात महत्वाचा ठरला. रोहित शर्मा दुपारच्या जेवणात ताज्या पालेभाज्या आणि वरण-भात यांचा समावेश करायचा.

दुपारी ४:३० वाजता (नाश्ता)

रोहित दुपारचे जेवण झाले की संध्याकाळी हलका नाश्ता घ्यायचा. यामध्ये फ्रूट स्मूदी, ड्रायफ्रुट्स यांचा समावेश असायचा. यामधून जास्त एनर्जीही मिळते. त्यामुळे संध्याकाळी ही गोष्ट रोहित सेवन करत होता.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

संध्याकाळी ७:३० वाजता (रात्रीचे जेवण)

डाएट करत असताना रात्रीचे जवण काय करायचे, हा सर्वांना प्रश्न असतो. पण रोहित रात्रीच्या जेवणात भाज्यांसह पनीर, पुलाव, भाज्यांचे सूप यांचा समावेश करायचा. पण हा रोहित शर्माचा अखेरचा आहार मात्र नसायचा. त्यानंतरही दोन तासांनी रोहित खास आहार घ्यायचा

रात्री ९:३० वाजता

रात्रीचे जेवण झाले की शेवटचा आहात सर्वात महत्वाचा असतो. रोहित शर्मा दिवसाच्या अखेरच्या आहारामध्ये दूधाचा ग्लास, मिक्स्ड नट्स यांचा समावेश करायचा.

रोहित शर्माचा संपूर्ण डाएट प्लॅन होता तरी कसा, पाहा..

सकाळी ७:०० वाजता – ६ भिजवलेले बदाम, अंकुर आलेले सॅलड, ताजे रस

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

सकाळी ९:३० वाजता (नाश्ता) – फळांसह ओटमील, एक ग्लास दूध

सकाळी ११:३० वाजता – दही, चिल्ला, नारळ पाणी

दुपारी १:३० वाजता (दुपारीचे जेवण) – ताज्या भाज्या आणि वरण-भात

दुपारी ४:३० वाजता – फ्रूट स्मूदी, ड्रायफ्रुट्स सकाळी

संध्याकाळी ७:३० वाजता (रात्रीचे जेवण) – भाज्यांसह पनीर, पुलाव, भाज्यांचे सूप

रात्री ९:३० वाजता – दूधाचा ग्लास, मिक्स्ड नट्स

रोहित शर्मासाठी वरण-भात दुपारी जेवताना भाजेपाल्यांचा जास्त फायदा झाला. रोहितने भाज्यांवर जास्त भर दिला आणि ही एक गोष्ट त्याच्यासाठी फायदेशीर ठरली. रोहित शर्माने ताज्या भाज्या (खासकरून पालेभाज्या) खात आपलं वजन तब्बल २० किलो घडवल्याचं आता समोर येत आहे.