फिनिक्स मॉलऑफ मिलेनियम मधील ‘एलिफंट टेल्स ऑफ इंडिया’ बनले आकर्षणाचा केंद्रबिंदू

0
32

पुणे : पुणे येथील फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियम तर्फे दिवाळी निमित्त कला, संस्कृती, परंपरा आणि उत्सवाचे सुंदर मिश्रण असलेल्या ‘एलिफंट टेल्स ऑफ इंडिया’ या आकर्षक कलाकृतीचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम अनेक वैशिष्टयांनी भरलेला होता ज्यात बॉलीवूड सेलिब्रिटी डिनो मोरियाने जगातील सर्वात मोठे हस्तिदंत असलेल्या एका भव्य कलाकृतीचे अनावरण केले, जे ४० फूट लांब आणि भारतीय इतिहासाच्या प्रमुख कालखंडांचे प्रतिबिंब असलेल्या डिझाईन्स, कोरीवकाम आणि अलंकारांनी सुशोभित केलेले आहे.

रात्रीच्या रात्रीच्या वातावरणात भर घालणारी १०० फूट लांबीची प्रकाशयोजना या ठिकणी असून परेड ऑफ लाइट्स अशी या प्रकाशयोजनेची संकल्पना आहे. हि प्रकाशयोजना मॉलला कला आणि प्रकाशाच्या चमकदार दृश्यात रूपांतर करते. याच ठिकाणी त्याच्या मध्यभागी १०० फूट उंचीची भव्य प्रकाश बोगदा कमान आहे हा प्रकाशमय बोगदा हा हत्तींच्या आकृत्यांनी उजळलेला असून जो अभ्यागतांना दिवे आणि संस्कृतीचा अविस्मरणीय प्रवासाचा फील देतो. प्रसिद्ध टीव्ही कलाकार आणि बिग बॉस सीझन १ च्या स्पर्धक स्मिता गोंदकर यांनी उदघाटन केले.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

बोधिवृक्ष, चमकदार पिवळ्या पानांसह भारतीय परंपरेची समृद्धी दर्शवितो. नॉर्थ बुश परिघातील गतिमान हत्तींची शिल्पे एक वेगळाच अनुभव देतात, तर बाहेरील बाजूस हत्तींच्या आश्चर्यकारक संरचनांनी सुशोभित केले आहे. उत्तर आणि पश्चिम प्रवेशद्वारांवर ४० फूट उंचीच्या हत्ती-संकल्पनेच्या भव्य कमानी पर्यटकांचे स्वागत करतात, ज्यामुळे त्यांच्या आतील बाजूस गेल्यास एक वेगळाच अनुभव येतो.

फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियमचे केंद्र संचालक विक्रम पै म्हणाले कि , “या दिवाळीच्या हंगामात ‘एलिफंट टेल्स ऑफ इंडिया’ लाईव्ह करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. “भारतीय संस्कृतीची समृद्धी प्रतिबिंबित करणारा अनुभव निर्माण करणे आणि सर्व वयोगटातील अभ्यागतांना हि विशेष मेजवानी देणे हे आमचे ध्येय होते. आम्हाला आशा आहे की ही नेत्रदीपक सजावट प्रत्येकासाठी आनंद, आश्चर्य आणि एकजुटीची भावना आणेल. आमच्या सर्व हितचिंतकांना अत्यंत आनंदी आणि समृद्ध दिवाळीच्या शुभेच्छा”.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती