महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी नितीन कदम यांचा शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल

0
1

पर्वती विधानसभा मतदारसंघातून अश्विनी नितीन कदम यांनी आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. अरण्येश्वर चौक पर्वती या ठिकाणावरून भव्य रॅलीचं करत आजपासून निवडणुक प्रचाराचा नारळ फोडला. पर्वतीमध्ये पुन्हा एकदा माधुरी मिसाळ आणि अश्विनी नितीन कदम असा सामना रंगणार आहे. महायुतीच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्या विरोधात महाविकास आघाडी च्या सौ. अश्विनी नितीन कदम मैदानात उतरल्या असून काँग्रेस पक्षाचे नेते अभय छाजेड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अंकुश काकडे, शिवसेना उबाठा पुणे अध्यक्ष संजय मोरे, माजी नगरसेवक अशोक हरणावळ यांच्या उपस्थितीत सौ . अश्विनी नितीन कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

यावेळी माजी खासदार वंदना चव्हाण, शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे, आमदार रविंद्र धंगैकर, भगवानराव साळुंखे, शशिकांत तापकीर, बाळासाहेब अट्टल, मृणालिनी वाणी माजी नगरसेवक बंडु नलावडे, राहुल तुपेरे, अमोल ननावरे, तुषार नांदे, अमोल परदेशी, शिवसेना विभाग प्रमुख अमोल रासकर, कॅांग्रेसचे पर्वती विधानसभा प्रमुख रमेश सोनकांबळे, संतोष पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्याचप्रमाणे महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादसह नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.