ठाकरेंच्या निकटवर्तीयांच्या घरांवर ईडीचे छापे; फडणवीस म्हणाले… अनुभव नसलेल्या कंपन्या

0
1

पुणे मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. या कारवाईत उद्धव ठाकरे गटाच्या तसेच आदित्य ठाकरेंच्या यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळपासून मुंबईत अनेक ठिकाणी सुरू असलेल्या या छापेमारीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील ईडीच्या छापेमारीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, नेमकी काय कारवाई चाललीय आहे, याबद्दल मला माहिती नाही पण एवढं निश्चित सांगतो, ज्यावेळेस मुंबई महानगर पालिकेत कोविड सेंटर सुरू करण्यात आले, त्या कोविड सेंटरमधील घोटाळा बाहेर आला तेव्हा धक्कादायक माहिती बाहेर आली होती. त्यावेळी कशाप्रकारे कुठलाही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार झाल्या आणि लोकांच्या जीवाशी खेळ करण्यात आलं. यातून अनेक मृत्यू झाले. पुण्यात तर एक पत्रकाराचाच त्यावेळी मृत्यू झाला त्याची चौकशी चालू होती. ही चौकशी कुठपर्यंत कुठपर्यंत पोहचली आहे, आता या छाप्यामध्ये काय मिळालं हे ईडी सांगू शकेल. मला त्याची कल्पना नाहीये असेही देवेंद्र फडणीस म्हणाले.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

आदित्य ठाकरेंचे अतिशय निकटवर्तीय समजले जाणारे सुरज चव्हाण यांच्या घरावर देखील ईडीने छापे टाकल्याचे वृत्त आहे. याचे थेट कनेक्शन जंबो कोविड सेंटर घोटाळ्याशी आहे का? याबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले की, मला असं वाटतं की ज्या-ज्या लोकांचं कनेक्शन असेल त्यांच्या घरीच ही छापेमारी चालली असेल. याबद्दल अधिकृत माहिती ईडीच देऊ शकेल.

राग अनावर होऊ शकतो, पण…

मिरा भाईंदरच्या भाजपच्या आमदार गीता जैन यांची अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी बोलताना फडणवीसांनी लोकप्रतिनिधींनी संयम बाळगला पाहिजे असं म्हटलं आहे. हे ठिक आहे की कधीतरी संताप होऊ शकतो, राग अनावर होऊ शकतो. तरीही लोकप्रतिनिधींनी संयम बाळगून कायद्याच्या चौकटीत काम केलं पाहिजे असेही देवेंद्र फडणीस म्हणाले.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे