हडपसर विधानसभा मतदार संघातून चेतन तुपे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
1

पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन तुपे यांनी सोमवारी (ता.28) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर, जेष्ठ नेते सुरेश घुले, शिवसेना (शिंदे) शहर प्रमुख नाना भानगिरे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी महापौर वैशाली बनकर, स्मिता गायकवाड, मारुती आबा तुपे, विकास रासकर, डॉ. शंतनू जगदाळे, अभिमन्यू भानगिरे, भाजप हडपसर विधानसभा मंडलअध्यक्ष संदीप दळवी, रवी तुपे व पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी चेतन तुपे यांनी आज सकाळी कै.विठ्ठल तुपे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रॉली हडपसर येथील साने गुरुजी भवन येथून निघाली. या रॉलीत राष्ट्रवादी (अजित पवार) भाजप व शिवसेचेचे (शिंदे) पदाधिकारी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. रॉली मंडई व पुणे सोलापूर मार्गावरून पुढे जात साने गुरुजी नाट्यग्रहाकडे गेली. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चेतन तुपे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

यावेळी बोलताना चेतन तुपे यांनी म्हणाले की, राष्ट्रवादीने सलग दुसऱ्यांदा विश्वास दाखविल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच लोकसभा निवडणुकीत हडपसरकर जनतेने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले. त्यामुळे आजच्या रॉलीला मिळालेला प्रतिसाद पाहून हडपसर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी होईल.

यावेळी बोलताना आमदार योगेश टिळेकर म्हणाले की, हडपसरच्या जनतेने महायुतीवर नेहमीच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत.‌ देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षात खूप मोठमोठी विकासकामे केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभरातील सर्व सामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबविलेल्या आहेत. आणि हडपसरचे आमदार म्हणून चेतन तुपे यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात राबविलेले सेवा उपक्रम आणि विकासकामे यामुळे हडपसरची जनता समाधानी आहे. त्यामुळे हडपसर मतदार संघातून चेतन तुपे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

दरम्यान, पुण्याच्या राजकीय परिदृश्यातील वैविध्यपूर्ण मतदार आणि धोरणात्मक महत्त्वासाठी ओळखला जाणारा हडपसर विधानसभा मतदारसंघ आहे. अलीकडच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. चेतन तुपे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्या अगोदर समर्थक आणि कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. महाराष्ट्रातील बदलती राजकीय घडामोडी आणि पुण्यासारख्या शहरी केंद्रांवर आपली पकड कायम ठेवण्याची राष्ट्रवादीची आकांक्षा पाहता चेतन तुपे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.