प्रचारातही डॉ. अंजली निंबाळकर यांच्या तत्परतेची चर्चा; अपघाताने जखमीवर उपचार सर्व स्तरातून त्यांचं कौतुक

0

सध्या देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारही शिगेला पोहोचला आहे. दरम्यान कर्नाटकमधील उत्तर कन्नड (कारवार) लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रचारात व्यस्त असानाही आपली ड्यूटी बजावली आहे. प्रचार आटोपून परतत असताता गंभीर जखमी झालेल्या तरुणावर त्यांनी स्वतः उपचार केले आहेत. अंजली निंबाळकर या पेशाने स्वतः डॉक्टर आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीतही त्यांनी आपलं कर्तव्य बजावल्याने सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे.

यल्लापूर-शिरशी महामार्गावर दुचाकीवरून घसरून पडलेल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला होता. रात्री प्रचार आटोपून जात असताना काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकरांच्या हा अपघात निदर्शनास आला. अंजली निंबाळकर यांनी त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये भरती केलं. जखमी तरुणावर स्वतः उपचार करत टाकेही घातले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील मराठी मतदारांची मोठी संख्या असणाऱ्या उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने मोठा डाव टाकला आहे. मराठा मतदारांची संख्येचा विचार करून कोल्हापूरच्या सूनबाई आणि कर्नाटकमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी डॉ. अंजली निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. मराठा आरक्षणासाठी आग्रही भूमिका मांडलेला मराठा चेहरा असलेल्या अंजली निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने भाजपसाठी ही निवडणूक सोपी नसणार आहे.

अंजली निंबाळकर या मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील उमरगामधील आहेत. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नात असल्याने त्यांना राजकारणाचे बाळकडू घराण्यातूनच मिळाले आहे. तसेच त्या कर्नाटकातील धडाडीचे आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी आहेत. अंजली निंबाळकर या पेशाने डाॅक्टर असून त्यांनी मुंबईत स्त्रीरोगतज्ज्ञ क्षेत्रातील उच्च शिक्षण पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर बेळगावच्या सिव्हील रुग्णालयामध्ये त्यांनी कर्तव्य बजावले. यावेळी ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांची आरोग्याची आणि आर्थिक परिस्थिती पहिल्यानंतर राजकारणाचा येण्याचा निर्णय घेतला. अंजली निंबाळकर या 2018-23 या दरम्यान बेळगावातील खानापूरच्या आमदार होत्या. यावेळी त्यांनी आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवत विकासकामांचा डोंगर उभा केला आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार