मोदींकडून पुन्हा ठाकरेंचं लक्ष्य; मुंबईला वर्ल्ड फायनान्स सेंटर आणि ग्लोबल फिनटेक कॅपिटल बनवण्याची गॅरंटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची स्तुतीसुमने

0
1

“मुंबई बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताचं शहर आहे. मुंबई स्वाभिमानाचं शहर आहे. पण आघाडीत एक असा पक्ष आहे, ज्याने बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिला आहे. म्हणून मी यांना आव्हान दिलं होतं. कांग्रेसच्या शहजाद्यांकडून एकदा तरी बोलवून घ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. ज्या दिवशी तुम्ही हे कराल, त्या दिवशी तुम्हाला खूप चांगली झोप येईल. कधी रुग्णालयात जावं लागणार नाही. बाळासाहेबांचे आशिर्वाद मिळतील. आजपर्यंत काँग्रेसच्या शहजादांनी बाळासाहेबांचं कौतुक केलं नाही. हीच आघाडीची सच्चाई आहे. वीर सावरकरांना शिव्या देणाऱ्यांनाही हे लोक गळ्यात गळा घालून फिरत आहेत”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली. ते मुंबईच्या शिवाजी पार्क येथे महायुतीच्या सभेत बोलत होते.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

जनतेला संबोधीत करताना मोदी पुढे म्हणाले, “मुंबई शहाराने दिर्घकाळ दहशतवादाचं संकट झेललं आहे. दहशतवादामुळे मिळालेल्या जखमांना येथील लोक अजूनही विसरले नाहीत. लोकल, बसमध्ये लोक घाबरून जात होती, अशी एक वेळ होती. आपल्या कुटुंबाची भेट होईल की नाही, असं लोक विचार करत होते. घरी परतणार की नाही? असा प्रश्न त्यांना पडत होता.

पण मागील काही वर्षात लोकांच्या मनात सुरक्षेचा भाव आला आहे. तेव्हा सरकार वेगळं होतं. आज मोदी आहे. काँग्रेस सरकार होतं तेव्हा मुंबईत दहशवादी घटना घडत होत्या. प्रत्येक जागी तुम्हाला संशयास्पद वस्तूंची भीती होती. बसमध्ये ट्रेनमध्ये बसल्यावर सूचना येत होती. कुकर, टिफीन बॉक्सची भीती वाटत होती. जर संशयास्पद वस्तू दिसल्या, तर लगेच पोलिसांना कळवा, असं म्हटलं जात होतं. आता हे सर्व बंद झालं आहे, असंही मोदी म्हणाले.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

एकनाथ शिंदेंनी मोदींवर उधळली स्तुतीसुमने

“स्वाभिमानका बुलंद नारा है मोदी… दुनिया के आसमान मै चमचमता तारा है मोदी… शिवतीर्थावरची भव्यता..ही आहे महायुती…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब या शिवतीर्थावरून विचारांचं सोनं वाटायचे. आज मोदीजी इथे विचारांचं सोनं वाटायला आले आहेत. म्हणूनच आजचा दिवस आपल्यासाठी दसऱ्यासारखा आहे. आपल्याला 23 तारखेला दिवाळी साजरी करायची आहे. फटाके सर्वांनी तयार करून ठेवा. छोटे मोठे फटाके नाही, मोठे अॅटम बॉम्ब फोडायचे आहेत. मोदीजी काही दिवसांपूर्वी मुंबईत येऊन गेले. विकासप्रकल्पांची उद्घाटनं आणि शुभारंभ करून गेले. तो फक्त ट्रेलर होता. पिक्चर अजून बाकी आहे. मोदीजी देशाचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार काम करत आहे. म्हणून राज्य सरकार आज नंबर वनवर आहे. मोदींनी मुंबईला वर्ल्ड फायनान्स सेंटर आणि ग्लोबल फिनटेक कॅपिटल बनवण्याची गॅरंटी दिली आहे. ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे”, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या!