ठाकरेंच्या शिलेदाराच्या निवृत्तीनंतर काँग्रेस ‘अँक्टिव्ह’ थेट सभापतींना दिले पत्र; मतांचे गणित कसं? सविस्तर पहा

0

महाराष्ट्र राज्य मध्ये विधानसभा निवडणुका झाल्यापासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे. त्यातच मुख्य सभागृह असलेल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद ही मागील महिन्यात रिक्त झाल्यामुळे नव्या गणिताची जुळवाजुळ करता काँग्रेस पक्षाच्या वतीने या पदावर दावा करण्यासाठी आखणी करण्यात आली असून नुकतीच विधान परिषद अध्यक्ष राम शिंदे यांची शिष्टमंडळामार्फत भेट घेण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत संख्याबळ नसल्याने महाविकास आघाडीतील तीन पक्षापैकी कोणत्याही एकाही पक्षाकडे संख्याबळ नाही. तर दुसरीकडे तर दुसरीकडे आता विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीची मुदत गेल्या महिन्यात संपली आहे. त्यामुळे सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे. सध्य परिस्थितीत विधिमंडळातील दोन्ही महत्त्वाच्या पदावर विरोधी पक्षनेता नाही. तर दुसरीकडे रिक्त झालेल्या या पदासाठी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत रस्सीखेच पहावयास मिळत आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिलेदार अंबादास दानवे आमदारकीची मुदत संपत असल्याने आठ दिवसापूर्वीच निवृत्त झाले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेतेपद आता येत्या काळात रिक्त राहणार आहे. त्यामुळेच आता राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. या पदासाठी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत होती. मात्र, सोमवारी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अमीन पटेल यांनी उद्धव ठाकरेंची यांची भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या 78 आहे. त्यापैकी सत्ताधारी महायुतीचे 40 सदस्य आहेत तर विरोधक असलेल्या महाविकास आघाडीकडे 16 सदस्य आहेत. तर सध्या 22 जागा रिक्त आहेत. विधानपरिषदेतील संख्याबळ पाहता महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६ सदस्य आहेत तर काँग्रेसकडे ७ सदस्य आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ सदस्य आहेत. हे संख्याबळ पाहता सध्या काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य आहेत. त्यामुळे काँग्रेसला संधी मिळण्याची शक्यता आहे. अंबादास दानवे यांची निवृत्ती आता काँग्रेसच्या पथ्यावर पडणार असल्याचे दिसते.

महाविकास आघाडीतील फॉर्म्युल्यानुसार विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येणार असून त्यामुळे काँग्रेसने विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला. विधानपरिषदेतील संख्याबळ पाहता महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६ सदस्य आहेत तर काँग्रेसकडे ७ सदस्य आहेत. या संख्याबळानुसारच काँग्रेसने या पदावर दावा केला असून त्याला बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ग्रीन सिग्नल दर्शवला आहे. त्यामुळे येत्या काळात या पदासाठी काँग्रेसला संधी मिळणार आहे. विधानपरिषद विरोधी पक्ष नेते पदासाठी काँग्रेसकडून सतेज पाटील इच्छुक असून त्यांचे नाव आघाडीवर आहे. दुसरीकडे हे विरोधी पक्षनेतेपद जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला गेले असते तर माजी मंत्री अनिल परब यांचे नाव आघाडीवर राहिले असते. मात्र, उद्धव ठाकरे यांनीच काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नावाला संमती दर्शवली आहे. त्यामुळे या वादावर पडदा पडला आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

महाविकास आघाडीतील समतोल

महाविकास आघाडीमध्ये पदे वाटून घेण्याबाबत एक अलिखित नियम आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद एका पक्षाकडे, तर विधान परिषदेचे पद दुसऱ्याकडे असा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात विधान परिषदेचे पद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे.

काय असणार राजकीय रणनीती?

काँग्रेस पक्षाने विधान परिषदेतील संख्याबळाच्या आधारे हे पद मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे पक्षाला विधान परिषदेत अधिक प्रभावी भूमिका बजावण्याची संधी मिळणार आहे. हे पद मिळवून काँग्रेस आपली ताकद आणि स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांच्या निवृत्तीमुळे विधान परिषदेत विरोधी पक्षांच्या संख्याबळात बदल झाला आहे, ज्यामुळे काँग्रेससाठी विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन