पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या लक्षात घेऊन पुण्यातील दक्षिण उत्तर वाहतूक व्यवस्था शोधून पूर्व पश्चिम रस्ते जोडण्याशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात झालेल्या आढावा बैठकीत पुणे शहरातील प्रस्तावित बोगद्यांची कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनास दिल्याने कोथरूड भागातील नागरिकांसाठी ‘मिसिंग लिंक’ चा मोठा टप्पा पार केला जाणारा सून पूर्वेकडील सातारा रस्ता ते पश्चिमेकडील पाषाण पुणे विद्यापीठ अशा सरळ मिसिंग लिंक जोडल्या जाणार असल्याने कोथरूडकर यांचा प्रवास अत्यंत सुखकर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोथरूड भागातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी विद्यमान आमदार चंद्रकांतदादा पाटील अहोरात्र प्रयत्न करत असताना दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच पुण्याच्या वाहतूक कोंडी मध्ये लक्ष घातल्याने कोथरूडमधील नागरिकांना या महत्वकांशी प्रकल्पाचा सर्वात जास्त फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार तळजाई-पाचगाव (हिंगणे ते विणकर सभागृह, सातारा रस्ता) आणि सुतारदरा-पंचवटी बोगद्याचे काम सुरू करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. कोथरूडच्या पश्चिमेकडील सुतारदरा ते पाषाण व पूर दक्षिणेकडील हिंगणे ते सातारा रस्ता असे प्रस्तावित नवीन बोगदे करण्यात येणार असल्याने (सध्या वापरत असलेला राजाराम पूल अन् युद्ध पातळीवर काम सुरू असलेला दुधाने नगरचा नवीन पूल) या मार्गावरील लोकांना या प्रस्तावित बघण्याचा बोगद्याचा फायदा नक्कीच होणार आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच या दोन्ही प्रस्तावित बोगद्यांच्या जागांची पाहणी केली असून, आराखडा तयार करण्याचे कामही हाती घेतले आहे.
पुणे महापालिकेचा विकास आराखडा, पुणे शहर सर्वंकष वाहतूक आराखड्यामध्ये चार बोगद्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामध्ये तळजाई खालून बोगदा खोदून सातारा आणि सिंहगड (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) रस्ता एकमेकांना जोडणे तसेच सुतारदरा-पंचवटी, पाषाण यांना जोडून कोथरूड आणि पाषाण परिसराला एकमेकांशी किमान वेळेत जोडणे अशी योजना आखण्यात आली आहे. याच दोन्ही रस्त्यांवर अन्य दोन बोगदे प्रस्तावित केलेले आहेत. पुणे महापालिका प्रकल्प विभाग मुख्य अभियंता दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता संदीप पाटील, उपअभियंता पवन मापारी, कनिष्ठ अभियंता संभाजी कवठे यांच्यासह सल्लागार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही बोगद्यांच्या मार्गांची नुकतीच पाहणी केली असून लवकरच याबाबत प्रारूप रचना आणि अंदाजपत्रकीय खर्च याचा लेखाजोखा मानणारा अहवाल सादर केला जाणार आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील एका टोका पासून दुसऱ्या टोक्याकडे म्हणजेच(सुतारदरा, कोथरूड परिसरातून पंचवटी पाषाण) भागात जाण्यासाठी सध्या अस्तित्वात दोन मार्ग आहेत. यापैकी चांदणी चौकातून गेल्यास ११ किलोमीटरचे अंतर जाऊन किमान ८ चौक ओलांडावे लागतात. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना ४० ते ५० मिनिटांचा कालावधी लागतो; त्याबरोबरच गोखले नगर भागातील सेनापती बापट रस्त्यावरून गेल्यास १० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी किमान ५० ते ६० मिनिटांचा कालावधी लागतो. पुणे महापालिका प्रशासनाने केलेल्या अहवालानुसार १.५ किलोमीटरचा हा बोगदा असून, सुतारदरा-पाषाण, पंचवटी अंतर हे फक्त ५ ते १० मिनिटांत कापले जाणार आहे.
तळजाई-पाचगाव बोगदा
सातारा आणि सिंहगड रस्त्याला जोडणाऱ्या या बोगद्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुकर होणार आहे. सातारा रस्त्यावरून धनकवडी, कात्रजमार्गे नवले पुलावरून सिंहगड रस्त्यावर जाण्यासाठी सध्या किमान नऊ चौक ओलांडावे लागतात. त्यासाठी ४० ते ५० मिनिटांचा कालावधी लागतो. त्याचप्रमाणे सातारा रस्ता-स्वारगेटवरून सिंहगड रस्त्यावर जाण्यासाठी सुमारे साडेसात किलोमीटरचे अंतर कापावे लागते. त्यासाठी किमान १० चौक ओलांडत सिंहगड रस्त्यावर पोहाचता येते. त्यालाही ४० ते ५० मिनिटांचा कालावधी लागतो. प्रस्तावित बोगद्याचे काम झाल्यानंतर अवघे अडीच किलोमीटरचे अंतर होणार असून, पाच ते दहा मिनिटांच्या कालावधीत रस्ता कापता येणार आहे.











