पुण्यात 45 वर्षानंतर ‘या’ ठिकाणी घुमणार पंतप्रधानाचा आवाज अन् शहरात फक्तं रोड शो; यामुळे ठिकाण बदललं

0

पुणे लोकसभेचे  महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पुण्यात पुढील सोमवारी (२९ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे, तसेच जाहीर सभा देखील होणार आहे. यापूर्वी एस. पी. कॉलेजच्या मैदानाचा मोदींच्या सभेसाठी विचार केला जात होता. मात्र, आता हे ठिकाण बदलले असून मोदींची सभा आता पुणे रेसकोर्सवर होणार आहे.

पुणे रेसकोर्स हे स्थळ हडपसर भागात बारामती, शिरूर आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघांच्या परिघावर आहे. त्यामुळे या सभेला राजकीय आहे.

भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी मोदींच्या सभेबाबत माहिती देताना म्हटले की, जास्तीत जास्त लोकांना बसता येईल, अशा दृष्टीने रेसकोर्सवर सभा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पोलिसांनीही स. प. महाविद्यालय मैदान किंवा खडकवासला येथील एखाद्या ठिकाणाऐवजी रेसकोर्सच्या स्थळाबाबत सकारत्मकता दर्शवली आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मंगळवारी सायंकाळी रेसकोर्सची पाहणीही केली. पुणे रेसकोर्सवर तब्बल साडेचार दशकांनंतर पंतप्रधानांची सभा होईल. यापूर्वी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांची जानेवारी १९७२ मध्ये आणि नंतर १९७७ मध्ये पुणे रेसकोर्सवर सभा झाली होती. आता पंतप्रधान मोदींची सभा होत आहे.