भारत-पाकिस्तानमध्ये शुक्रवार आणि शनिवारच्या रात्री तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शुक्रवारी संध्याकाळी पाकिस्तानने भारताच्या 26 लोकेशनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानच्या अनेक शहरांना लक्ष्य केलं. भारताने 6 बॅलेस्टिक मिसाईल्स डागल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. तीन एअरबेसवर स्फोट झालेत. त्यानंतर पाकिस्ताने आपली एअर स्पेस बंद केली आहे.
जाणून घ्या मोठ्या अपडेट्स….
1 भारताने पाकिस्तानच्या नूर खान (रावळपिंडी), मुरीद (चकवाल) आणि रफीकी (शोर्कोट) एअरबेसवर प्रभावी हल्ले केले. यामध्ये त्यांचं मोठ नुकसान झालं आहे. पाकिस्तानच्या सैन्य इन्फ्रास्ट्रक्चरला हा मोठा धक्का मानला जात आहे. सीमेवरील तणाव आणखी वाढला आहे.
2 पाकिस्तानने आज दुपारी 12 वाजेपर्यंत आपला एअरस्पेस पूर्णपणे बंद केला आहे. पेशावरला जाणाऱ्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सची फ्लाइट PIA218 ला क्वेटा येथे उड्डाण करताना पाहण्यात आलय.
3 पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह लाहोर आणि अन्य काही मोठ्या शहरात स्फोटाचे आवाज ऐकू आले. पाकिस्तानी सैन्याचा दावा आहे की, भारताने बॅलेस्टिक मिसाइल्स डागले.
4 पाकिस्तानने काल सलग तिसऱ्यादिवशी ड्रोन हल्ले केले. भारताने याला पाकव्याप्त काश्मीरमधील नीलम घाटी आणि सियालकोटमध्ये हल्ले करुन चोख प्रत्युत्तर दिलं.
5 सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आलेत. यामध्ये सरसा क्षेत्रात भारताने पाकिस्तानच्या लॉन्ग रेंज मिसाइल यशस्वीरित्या रोखल्याच दिसत आहे. सरसाच्या जिल्हा सूचना अधिकाऱ्याने नागरिकांना घराच्या आतच रहाण्याचा सल्ला दिला आहे.
6 S-400, L-70, Zu-23 आणि शकिल्का सारखी भारताची अत्याधुनिक एअर डिफेन्स प्रणाली सीमेवर तैनात आहे. या सिस्टिमने पाकिस्तानचे ड्रोन हल्ले विफल केले आहेत. त्याशिवाय पाकिस्तानी बॅलेस्टिक मिसाईल्स हवेतच नष्ट केली आहेत.