महाराष्ट्र हादरवणारे पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरण नवा ट्विस्ट, “आरोपी अद्याप फरार तरीही मुलाला क्लिन चीट!”

0
1

भाजपचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे तत्कालीन नेते महेश गायकवाड यांच्यासह त्याचे साथीदार राहुल पाटील यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला होता. गणपत गायकवाड यांनी जवळपास ६ राऊंड फायर केले होते. या प्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडला या आरोपपत्रात क्लिनचीट देण्यात आली आहे.

महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या कल्याण पोलीस स्टेशनमध्ये भाजपचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणी उल्हासनगर कोर्टात पुरवणी चार्जशीट दाखल केलं आहे. या पुरवणी चार्जशीटमध्ये एकूण दोन आरोपी आहे. नागेश बडेराव आणि कुणाल पाटील आहेत यात आरोपी आहे. गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडला मात्र या आरोपपत्रात क्लिनचीट देण्यात आलं आहे.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

वैभव विरोधात कोणताही सबळ पुरावा आढळून आला नाही आणि वैभवचा गुन्ह्यात कोणताही सहभाग आढळून आला नाही असा चार्जशीट मध्ये उल्लेख केला आहे. वैभव गायकवाड मात्र अद्यापही फरार आहे.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात ठाणे क्राईम बँचने वैभवच्या बाबतीत फॉर्म 5C कोर्टात दाखल केला आहे. FIR मधे नाव जरी असले तरी गुन्ह्यात सहभागाबद्दलचा सबळ पुरावा नसल्याने फॉर्म 5C दाखल केला असून तो फॉर्म कोर्टाने स्वीकारला आहे. दोष निश्चित करण्यासाठी लवकरच कोर्ट तारीख निश्चित करणार आहे.

काय आहे प्रकरण?

महेश गायकवाड हे मुळचे कल्याण पुर्वेतील तिसगावाचे भूमिपुत्र आहेत. गणपत गायकवाड यांना केबल व्यवसायात टक्कर दिल्याने महेश गायकवाड चर्चेत आले. त्यांचा श्रद्धा केबल हा केबलचा मोठा व्यवसाय आहे. दरम्यान गणपत गायकवाड यांचा कट्टर विरोधक म्हणून कल्याण पुर्वेत महेश गायकवाड उदयास आले. 2015 साली शिवसेना पक्षातून कल्याण डोंबविली महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात महेश गायकवाड उतरले.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

निवडणुकीत पराभव

महेश गायकवाड यांनी  निवडणुकीत आमदार गणपत गायकवाड यांचे बंधू विष्णू गायकवाड यांचा परभाव केला. ते नगरसेवक झाले. बघता बघता महेश गायकवाड यांनी बांधकाम व्यावसायात देखील मोठं नाव कमवलं. एक वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला त्यावेळी महेश गायकवाड यांनी मोठ्या संख्येनं आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युती न झाल्यास गणपत गायकवाड यांच्या विरोधात महेश गायकवाड प्रमुख दावेदार होते. दोघांमध्ये राजकीय शीतयुद्ध सुरू होतं. उल्हासनगरमधील द्वारली गावातील जमिनीवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्या जागेवर बांधलेली भिंत महेश गायकवाड यांनी पाडली होती. यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. तिथे वाद विकोपाला गेला आणि गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटील यांच्यावर पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्येच गोळीबार केला.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली