”पुष्पा 2’पेक्षाही ‘छावा’ सुस्साट; वसूल केलं 270% बजेट तर ‘पुष्पा 2’चे मेकर्स पेक्षाही दुप्पट फायदा कमाईची घौडदौड सुरूच ठेवेल असं दिसत 

0
1

2025 सालचा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ‘छावा’  प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट दररोज काही ना काही विक्रम रचत आहे. विक्की कौशलच्या या चित्रपटानं 2025 सालच्या सर्वात मोठ्या चित्रपटाचा किताबही आपल्या नावे केला आहे. तर, आपल्या छप्परफआड कमाईनं ‘छावा’ अनेक दिग्गजांचे रेकॉर्ड्सही मातीमोल करत आहे.

रिलीज होऊन 11 दिवस झाले आहेत आणि गेल्या 10 दिवसांत चित्रपटानं केलेली जबरदस्त कमाई पाहता, आजही हा चित्रपट आपली कमाईची घौडदौड सुरूच ठेवेल, असं दिसत होतं. चित्रपटाच्या कमाईशी संबंधित आजचे सुरुवातीचे आकडे देखील आले आहेत, तर चित्रपटानं आतापर्यंत किती कमाई केली, ते जाणून घेऊयात…

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

‘छावा’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘छावा’च्या निर्मात्यांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, चित्रपटानं  10 दिवसांत 334.51 कोटी रुपये कमावले आहेत. खालच्या टेबलमध्ये दिलेले आकडे SACNIL च्या वेबसाईटनुसार आहेत आणि सकाळी 10:45 पर्यंतचे आहेत. खाली देण्यात आलेले आतापर्यंतच्या एकूण कमाईशी संबंधित आकडे अंतिम नाहीत आणि ते बदलू शकतात…

दिवस कमाई (कोटींमध्ये)

पहिला दिवस 33.1

दुसरा दिवस 39.3

तिसरा दिवस 49.03

चौथा दिवस 24.1

पाचवा दिवस 25.75

सहावा दिवस 32.4

सातवा दिवस 21.60

आठवा दिवस 24.03

नववा दिवस 44.10

दहावा दिवस 18

एकूण 352.51

किती टक्के वसूल बजेट वसूल केलं ‘छावा’नं

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

‘छावा’ची निर्मिती जवळपास 130 कोटी रुपयांच्या भांडवलात करण्यात आली आहे.  300 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर आता चित्रपट फार वेगानं 400 कोटींचा टप्पा गाठण्याच्या दिशेनं घौडदौड करत आहे. अशातच चित्रपटानं आतापर्यंत आपल्या बजेटच्या अडीचपट जास्त कमाई केली आहे. जर, याची टक्केवारी काढायची झाली तर, तब्बल 270 टक्क्याांहून अधिक कमाई ‘छावा’नं  केली आहे.

‘पुष्पा 2’पेक्षाही सुस्साट ‘छावा’

‘छावा’नं विक्रम रचला आहे, कारण ‘पुष्पा 2’ला लाईफटाईम कमाईतून बजेटचा इतका टक्काही वसूल करता आलेला नाही.  ‘पुष्पा 2’चं लाईफटाईम घरगुती बॉक्स ऑफिस कलेक्शन 1234.1 कोटी रुपये आहे, तर याचं भांडवल 500 कोटी होतं. यानुसार, ‘पुष्पा 2’नं आपल्या बजेटच्या फक्त 246 टक्के अधिक कमाई केली आहे. तर, ‘छावा’नं अल्लू अर्जुनच्या फिल्मला मागे टाकत फक्त 11 दिवसांत 270 टक्क्यांहून अधिक कमाई केली आहे.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

दरम्यान, ‘छावा’चं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांची भूमिका विक्की कौशलनं साकारली आहे. चित्रपटात रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसून आली आहे, तर अक्षय खन्नासह आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंह यांनीही दमदार अभिनय केला आहे.