‘मुंडे साहेबांचे नाव लहान होऊ देणार नाही जरी नाव मोठे करण्याची…’ पंकजा मुंडे भगवान गडावर काय म्हणाल्या?

0

बीडच्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथे श्रीक्षेत्र भगवानगडाच्या नारळी सप्ताहाचा समारोप झाला. या अध्यात्मिक व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस एकत्र आले. त्यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या भगवान गडाशी संबंधित आठवणी सांगितल्या. त्या म्हणाले, गोपीनाथ मुंडे साहेबांचे नाव मोठे करण्याची माझी ऐपत नाही. परंतु हे नाव लहान होऊ देणार नाही. जीवनात कोणाला दुखवणार नाही. इतकेच मागणे मी भगवान बाबांकडे करते, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी पाच वर्ष सत्तेत नसताना गडाच्या विकासासाठी सहकार्य केले. मी पालकमंत्री होते तेव्हासुद्धा मदत केली. गडासाठी मदत करावी म्हणजे काय? गडावर येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. त्यांना कोणताही त्रास होऊ नये, ही काळजी घेतली पाहिजे. २००६ मध्ये काही कामांमुळे साहेबांना गडावर येता आले नाही. त्यांनी त्यावेळी मला पाठवले. मी भगवान गडावर पहिल्यांदा २००६ मध्ये येऊन भाषण केले होते. त्यानंतर मी भगवान गडावर नेहमी येत राहिले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

नारळी सप्ताहाची थोर परंपरा आहे. येथून सर्व वारकरी संप्रदायचा जन्म होतो. वामन भाऊंचा आदरयुक्त धाक आहे. भगवान बाबांच्या जीवनात सर्व वैभव आणि संपत्ती होती. त्यानंतर त्यांनी सर्व सुखाचा त्याग करुन ईश्वराच्या मार्गाने जाण्याची वैभवशाली परंपरा सुरु केली. ज्याच्या कार्मात वैभव आहे, तोच जीवनात पुढे जाऊ शकतो, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

पंकजा मुंडे यांच्या भाषणातील धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात काम केल्यामुळे आमचे वेगळ नाते तयार झाले आहे. केवळ गडाचा विकास नाही, तर गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे. संत वामनभाऊ यांनी मार्ग दाखवला आहे. कितीही दुष्काळ असला तरीही सप्ताह होतात. लोक एकत्रीत येतात, सर्व समाजाचे लोक एकत्र येत असतात, वारकरी समाजात कधी जात पात नसते. प्रत्येक व्यक्ती गहनीनाथ गडाचा असतो. ही परंपरा समाज बनवणारी परंपरा आहे, समाज तोडणारी नाही. मुस्लिम बांधव देखील या परंपरेत सहभागी होतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती