भिडे यांना धक्क्यावर धक्के सुरूच; चिपळूणमधून मोठी बातमी समोर परवानगी नाकारल्याची माहिती

0

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना धक्का देणारी मोठी बातमी चिपळूण येथून समोर आली आहे. संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला नुकतंच औरंगाबाद येथे परवानगी नाकारण्यात आल्याची बातमी ताजी असताना आता चिपळूण येथूनही तशीच बातमी समोक आली आहे. संभाजी भिडे यांच्या चिपळूण येथील कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. संभाजी भिडे हे उद्या 3 ऑगस्टला चिपळूणला जाणार होते. ते नियोजित कार्यक्रमासाठी चिपळूणला जाणार होते. पण त्यांच्या नियोजित कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने चिपळूणमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संभाजी भिडे उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडे परवानगी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र प्रशासनाने संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या विविध घडामोडींमुळे संभाजी भिडे यांची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती