पुणे भाजप शहरध्यक्ष व्यायामशाळा कार्यालयात वीजचोरी; सत्तेमुळे दंडात 12 वर्षाची सूट? प्रकार माहिती अधिकारात उघड

0
1

पुणे:- भारतीय जनता पक्ष गल्ली ते दिल्ली सत्ता… त्याच पक्षातील शहरातील मुख्य पद आणि सभागृहातील ही मानाचे पद मग काय ‘हम सब करे सो कायदा!’ च की एवढं सगळं असल्यावर प्रशासन तरी काय करणार. असाच एक प्रकार पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याबाबतीत समोर आला आहे. विशेष म्हणजे सानेगुरुजी नगर, आंबील ओढा येथील वापरात असलेली इमारत ही स्व- मालकीची नसून पुणे महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेली आहे. , भ्रष्टाचारात अडकलेली भाजप संचलित व्यायामशाळा, विरंगुळा केंद्र वीजचोरी उघड झाल्याने कांग्रेस- शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आज कांग्रेस- शिवसेना एकत्र शिष्टमंडळाने महावितरण पुणे परिमंडळचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांची भेट घेऊन त्यांना घेराव घातला. यावेळी शिष्टमंडळात किशोर मारणे शहर अध्यक्ष- राजीव गांधी पंचायत राज संघटन पुणे, अक्षय जैन – जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस, अनंत घरत शिवसेना प्रसिद्धी प्रमुख, सागर धाडवे सरचिटणीस युवक कॉंग्रेस पुणे, कुणाल काळे- युवक काँग्रेस उपाध्यक्ष पुणे, अविनाश अडसूळ – पुणे शहर सचिव, हनुमंत गायकवाड उपाध्यक्ष कोथरूड विभाग हे उपस्थित होते.

सामान्य माणसाला वेगळा न्याय आणि पुणे भाजप च्या शहराध्यक्षाला वेगळा न्याय का ? वीजचोरी उघड होऊनही कारवाई का नाही? गेले अनेक वर्ष सदर प्रकरण का दाबण्यात आले? ह्या भ्रष्टाचारात महावितरणच्या पेशवे पार्क उपविभागचा महत्वाचा वाटा सिद्ध झाला आहे असा आरोपही निवेदन देताना करण्यात आला आहे.   माहिती अधिकारात माहिती मागविली असता २६/०४/२५ च्या महावितरण पेशवे पार्क उपविभाग कार्यालयातील स्थळ पाहणी अहवालात असे वीजचोरीचे प्रकार निदर्शनास आले. महावितरण पेशवे पार्क विभाग ने त्यांना फक्त १ वर्षाचा दंड ९५,३३०/-₹ आकारला आहे पण मागील १२ वर्षाची थकबाकी का वसूल केली जात नाही. स्थळपाहणी अहवालात मुद्दाम अनेक त्रुटी महावितरण अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या जेणेकरून स्थानिक भाजप नगरसेवक, शहराध्यक्षाला वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. स्थळपाहणीत वीज दंडाची रक्कम कमी करण्यासाठी व्यायामशाळेतील काही मशीन आणि एयर कंडीशनरचा उल्लेखही टाळण्यात आला आहे. अहवालात भाजप कार्यालय तसेच स्थानिक नगरसेवक नाव गाळून फक्त कार्यालय” शब्दाचा उल्लेख केला आहे. शेकडो मुलांकडून व्यायामासाठी पैसे घेत व्यावसायिक वापर असतानाही वीज वापरामध्ये ‘पब्लिक’ सर्व्हिस असे नमूद केले आहे. पुन्हा स्थानिक सत्ताधारी नगरसेवकाला वाचवण्यासाठी कोणत्यातरी त्रयस्थ व्यक्तीचे नाव चालक म्हणून टाकण्यात आले आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

संबंधित सानेगुरुजी नगर, आंबील ओढा कॉलनी येथील पुणे शहरातील नामवंत भाजप शहरअध्यक्ष , माजी नगरसेवक ह्यांचे कार्यालय, व अंदाजे ३००० प्रति चौरसफूट असणारी भव्य दुमजली कै भानुदास गेजगे व्यामशाळा, तसेच विरंगुळा केंद्र अश्या पुणे मनपाच्या वास्तू सन २०१२ पासून असून सदर वास्तू पुणे मनपा क्रीडा व मालमत्ता  विभागाकडे ९ एप्रिल २०२५ पर्यंत  हस्तांतरित करण्यात आल्याच नाहीत. सन २०१२ पासून सदर तीनही वास्तूंना विजपुरवठा होत आहे. व्यायामशाळा ही नगरसेवक स्वतः त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत चालवत आहेत तसेच सानेगुरुजी नगर मधील भाजप कार्यालय हे स्वतः नगरसेवक अनेक वर्ष वापरत आहेत तसे त्या वास्तूवर त्यांचे नावही आहे, तिथेही अनेक अद्यावत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आहेत असे असताना त्यांचा उल्लेख महावितरण अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्र शासनाची फसवणूक केली जात असून भ्रष्टाचारास महावितरण विभाग ही तितकाच जबाबदार आहे असा आरोप काँग्रेस कार्यकर्ते सागर धाडवे यांनी निवेदनात केला आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

कै भानुदास गेजगे व्यायामशाळा सानेगुरुजी नगर , लोकमान्य नगर व्यायामशाळा, आणि कै चंद्रकांत बोत्रे व्यायामशाळा, शाळा क्रमांक १७, नवी पेठ पुणे ३०, या पुणे मनपाच्या व्यायामशाळा मालमत्तेची विज मीटरची बिले १६/०४/२५ च्या माहिती अधिकारात मागवली असताना महावितरणकडून माहिती अधिकारात मयत व्यक्तींची बिले देण्यात आली अश्या प्रकारे माहिती अधिकारात माहिती घेणाऱ्याची फसवणूक पेशवे पार्क उपविभाग कार्यालय कडून केली गेली आहे. सामान्य माणसाला ५००/-₹ नाही वेळेवर भरले तर विज तोडणारे महावितरण चे अधिकारी ह्या विषयात गेले १३ वर्ष शांत का आहेत? त्यांनाही भ्रष्टाचाराचा काही वाटा जातो का? त्यामुळे सदर भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग पुणे पोलिस आयुक्त यांस तक्रार करणार असल्याचेही तक्रारदार सागर धाडवे यांनी सांगितले आहे. महावितरणने अश्या भ्रष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करावी, कठोर कारवाई करावी, मागील १२ वर्षाची थकबाकी वसूल करून स्थानिक भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखलची कारवाई करावी असे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळाकडून कळविण्यात आले.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

आज दाखल झालेल्या निवेदनाची योग्य ती शहनिशा करून योग्य कारवाई करण्यात येईल असे महावितरण अधीक्षक अभियंता यांनी सांगितले. सदर भ्रष्टाचाराची माहिती कांग्रेस कार्यकर्ते तक्रारदार सागर धाडवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी यांस ह मेल द्वारे पाठविली आहे.