कर्वेनगर स्मशानभूमी दुरावस्थेत; अत्यंविधी बेडवरच पाणी गळतीने ‘जलधारा’: दुधाने

0
2

कर्वेनगर येथे स्मशानभुमी मधील अत्यंविधीच्या शेड वरील पत्रा पूर्णपणे खराब झाला असुन मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. विशेष करून हे पावसाचे पाणी बरोबर मध्य ठिकाणावरुन खाली चालु असलेल्या अत्यंविधीवरच पाणी गळती होत असल्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्या अनुषंगाने ताबडतोब अंत्यविधी शेडवरील पत्रा बदलण्याची मागणी पुणे महापालिकेचे आयुक्त यांना लक्ष्मी दुधाने माजी नगरसेविका पुणे मनपा व स्वप्नील दुधाने यांनी केली आहे.

अत्यंविधीचा मृतदेह पावसामध्ये पाणी पडत असल्यामुळे व्यवस्थित अग्निविधी होत नाही. या दृष्टिकोनातून आपण कर्वेनगर स्मशानभूमी मधील हा खराब पत्रा बदलण्याबाबत योग्य ती कारवाई करावी. पाणी गळती होऊन खाली चालू असलेल्या अंत्यविधीवर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात पडत असल्याने नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी उपाध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी केली आहे. आगामी काळामध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर या भागामध्ये दुरुस्तीची काम करण्यासही असंख्य अडचणी येत असल्याने तात्काळ या गंभीर समस्येची दखल घेण्याची मागणी ही निवेदनात करण्यात आलेली आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या!