मला मोठं केलं, अशा फालतू गोष्टी करू नका, इतिहास जाणून घ्या,; रोहित पवारांना भुजबळांचा सल्ला

0

‘मी 1985 मध्ये महापौर आणि आमदार झालो. त्यानंतर चार महिन्यांनी रोहित पवार यांचा जन्म झाला. त्यामुळे मला मोठं केलं, मोठं केलं, अशा फालतू गोष्टी करू नका, त्यासाठी इतिहास जाणून घ्या, असा सल्ला छगन भुजबळांनी रोहित पवारांना दिला. तसेच जास्त काही मी त्यांना किंमत देत नाही. त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी त्यांना उत्तर देईल, असा इशाराच यावेळी भुजबळांनी रोहित पवारांना दिला.

आज मंत्री छगन भुजबळ हे नाशिकमध्ये असून आज पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, मी 1985 मध्ये महापौर आणि आमदार झालो. त्यानंतर चार महिन्यांनी रोहित पवार यांचा जन्म झाला. त्यामुळे मला मोठं केलं, मोठं केलं, अशा फालतू गोष्टी करू नका, त्यासाठी इतिहास जाणून घ्या, असा सल्ला भुजबळांनी दिला. त्याचबरोबर अजित पवार आणि तुम्ही पवार घराणे यांनी ठरवून साहेबांचा राजीनामा घ्यायचं ठरवलं, आम्हाला सांगितलं होतं का? असा प्रतिप्रश्नही केला. जास्त काही मी त्यांना किंमत देत नाही. त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी त्यांना उत्तर देईल, असा इशाराच यावेळी भुजबळांनी रोहित पवारांना दिला.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?

शरद पवार यांनी नुकतीच येवल्यात पहिली जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी कुणाचंही नाव न घेता अनेकांवर निशाणा साधला. आता अजित पवार गट उत्तर सभा घेणार का? या प्रश्नावर भुजबळ म्हणाले की, लवकरच त्याचे नियोजन केले जाईल. सद्यस्थितीत इतर आमदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. काही आमदार हे सुरुवातीला पवार यांच्यासोबत होते, ते आता परत येत आहे. सदर आमदारांचे प्रतिज्ञापत्र करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान मंत्री छगन भुजबळ आज पुणे दौऱ्यावर असून ते फुले वाड्याला भेट देणार आहे. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे आशीर्वाद घेणार आहेत. ते आमच्यासाठी ऊर्जा स्थान असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

लवकरच उत्तर सभा
तसेच आठ दिवस होऊनही अद्यापही अद्याप मंत्री मंडळाचे खाते वाटप होत नसल्याची चर्चा आहे. यावर भुजबळ म्हणाले की, एवढं काही काळजी करण्याचे कारण नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील महिनाभरानंतर मंत्र्यांना घेतले. त्यामुळे लवकरच होईल असेही भुजबळ म्हणाले. दरम्यान बडवे या शब्दावरून अनेक जण आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. बडवे हा शब्द खोचक असा शब्द नाही. मी पण विचार करत आहे की, का हा वाक्प्रचार आहे. मात्र राजकारणात सतत काही लोकं आजूबाजूला असतात आणि कानाला लागलेले असतात.त्याच्या मागे कुणाचाही अपमान करण्याचा माझा हेतू नसल्याचे छगन भुजबळांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?