पालकमंत्रीपदावरून भाजपाची मोठी खेळी, रायगडचं पालकमंत्रीपद शिंदेकडे, तर मनपा निवडणुकीपूर्वी मुंबई खिशात

0

राज्यातील पालकमंत्रीपदाची यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली, पण रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीच्या नेत्यांमध्येच धूसफूस सुरू होती. अदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून ( शिंदे गट) विरोध झाला. तर नाशिकमध्येही दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये वातावरण होतं. पण पालकमंत्रीपदाचा तिढा आता सुटल्याची चर्चा आहे. कारण रायगडचं पालकमंत्रीपद हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. दरम्यान शिंदेंकडे असलेलं मुंबईचं पालकमंत्रीमद हे भारतीय जनता पक्षाकडे जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे. भरत गोगावले- तटकरे या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जात आहेत. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील शिवेसना एकानथ शिंदे गटाचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांच्यात वाद सुरू आहे. त्यावरच हा तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

मागील अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रपदावरून तिढा निर्माण झाला होता. रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू होता. अदिती तटकरे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर भरत गोगावलेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे एकनाथ शिंदेना मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शिंदेंकडे सध्या मुंबईचं पालकमंत्रीपद असून ते भाजपकडे जाणार असल्याचं सूत्र सांगत आहेत.

अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद सुरू होता. सुरूवातीला रायगडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवाी काँग्रेस अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं. पण भरत गोगावलेच्या नाराजीनंतर या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र या स्थगितीनंतरही गोगावले- तटकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना सुरूच आहे. महाड विधानसभा संघातील सर्वच पदाधिकाऱ्यांकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळत शिवसैनिकांनी निदर्शनं केली. मात्र आता या वादावर तोडगा काढत शिवसेना शिंदे गटाकडे, प्रामुख्याने एकनाथ शिंदेंकडे हे पालकमंत्रीपद सोपवण्यात येण्याची शक्यता आहे, असी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यावर आता भरत गोगावले आणि अदिती तटकरे काय प्रतिक्रिया देतात,ते पाहणं महत्वाचं ठरेल.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

रायगडच्या पालकमंत्रीपदाला देण्यात आली होती स्थगिती

रायगडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांना मिळालं, मात्र त्यामुळे नवा संघर्ष निर्माण झाला. भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री पद न मिळाल्याने ते प्रचंड नाराज झाले. गोगावले यांच्या नाराज झालेल्या शिवसैनिक कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळून रात्री मोठा हंगामा केला. या संदर्भात पोलिसांना हस्तक्षेप करुन महामार्गाची वाहतूक कोंडी दूर केली. मात्र भरत गोगावले यांचे कार्यकर्ते आता प्रचंड आक्रमक झाले असून गोगावले यांचे मंत्री झाल्यानंतर एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मिळालेले पदही काढून घेतल्याने ते प्रचंड नाराज होते. त्यानंतर रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली होती. आता हा तिढा लवकरच सुटण्याची शक्यत आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन