टीम इंडियाची पुण्यात कशी आहे आतापर्यंतची कामगिरी? पाहा आकडेवारी

0

टीम इंडिया आणि इंग्लंड दोन्ही संघांमध्ये सध्या टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. आतापर्यंत या मालिकेतील एकूण 5 पैकी 3 सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने सलग 2 विजय मिळवले. तर इंग्लंडने राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियावर मात करत विजयाचं खातं उघडलं. टीम इंडिया या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा सामना हा पुण्यात एमसीए स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या निमित्ताने आपण टीम इंडियाची पुण्यातील या स्टेडियममधील टी 20 फॉर्मेटमधील कामगिरी कशी राहिली आहे, हे जाणून घेऊयात.

टीम इंडियाचे पुण्यातील आकडे

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

टीम इंडियाने पुण्यात आतापर्यंत एकूण 4 टी 20i सामने खेळले आहे. टीम इंडियाने या स्टेडियमध्ये पहिला टी 20i सामना हा 2012 साली खेळला होता. तर टीम इंडियाने अखेरचा सामना हा 2023 साली खेळला. टीम इंडियाने या मैदानातील आपल्या पहिल्या टी 20i सामन्यात इंग्लंडवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. श्रीलंकेने 2016 साली टीम इंडियावर 5 विकेट्सने मात केली होती. त्यानंतर टीम इंडियाने 2020 साली श्रीलंकेवर 78 धावांनी विजय मिळवत मागील पराभवाची परतफेड केली. तसेच भारताला 2023 मध्ये 16 धावांनी पराभूत व्हावं लागलेलं.

टीम इंडियाने पुण्यात अशाप्रकारे एकूण 4 टी 20i सामने खेळले आहेत. टीम इंडियाने 4 पैकी 2 सामने जिंकले तर तितकेच गमावले. त्यामुळे टीम इंडियाची पुण्यातील कामगिरी फारशी चांगली नसली तरी वाईटही नाही. आता टीम इंडिया या मैदानातील पाचव्या टी 20i सामन्यात कशी कामगिरी करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.

टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.