टीव्हीच्या आणखी एका सुनेचा संसार मोडणार ? दिव्यांका त्रिपाठीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

0

काही दिवसांपूर्वीच टीव्ही अभिनेत्री मुग्धा चाफेकर आणि रवीश देसाई हे वेगळे झाले. आपण घटस्फोट घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. तर अभिनेता अमन वर्मा आणि वंदना ललवानी यांनीही 9 वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय घेतलाय. या सर्व पार्श्वभूमीवर आता आणखी एका टीव्ही अभिनेत्रीच्या नात्यात दुराव आल्याच्या चर्चा सुरू झाल्याने गोंधळ माजला आहे.टीव्हीवरची नामवंत अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही तिच्या पर्सनल लाईफमुळे बरीच चर्चेत असते. सध्या ती छोट्या पडद्यापासून दूर असली तरी आजही तिचे लाखो चाहते आहेत. दिव्यांकाचं लग्न अभिनेता विवेक दहियाशी झालं. 8 जुलै 2016 साली दोघांनी सप्तपदी घेतल्या. गेल्या 9 वर्षांपासून एकत्र असलेलं हे जोडपं सध्या बरंच चर्चेत आलं आहे. त्या दोघांमध्ये काहीह आलबेल नसून दोघंही लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यामुळे टीव्हीच्या आणखी एका स्टारचा संसार मोडणार असल्याच्या अफवांना पीक आलं होतं.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

पण आता या सर्व बातम्यांवर दिव्यांकाचा पती आणि अभिनेता विवेक दहिया याने मौन सोडलं आहे. घटस्फोटाच्या बातम्यांबद्दल विवेक नेमकं काय म्हणाला ?

घटस्फोटाच्या चर्चा फेटाळल्या

या सर्व बातम्यांवर विवकेने प्रतिक्रिया दिली आहे. ‘ खूप मजा येत्ये, मी ते पाहिलं. मी आणि दिव्यांका हसत होतो. आईस्क्रीम खात खात आम्ही ( बातम्या) वाचत होतो. हे जर अजून जास्त वेळ चाललं असतं तर आम्ही पॉपकॉर्न देखील मागवलं असतं. हे फक्त एंटरटेनमेंट आहे, बाकी काहीच नाही. मी देखील यूट्यूब व्लॉगिंग करतो, क्लिकबेल्ट काय असतं ते मला माहीत आहे. त्यामुळे हे जे बिझनेस मॉडेल आहे, ते मला नीट माहिती आहे. खळबळजनकग थंबनेल टाकलं की लोकं येतातच, ते व्हिडीओ पाहतात. पण त्यात काहीच नसतं. तुम्हाला काही अनरिअल दिसलं तर व्ह्यूज वाढवू नका. फालतू न्यूज असतात, त्या तर येतच राहतात, हे खोटं मनोरंजन आहे ‘ अशा शब्दांत प्रतिक्रिया देत विवकेने या सर्व (घटस्फोटाच्या) बातम्या फेटाळून लावल्या.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

9 वर्षांपासून दोघं एकत्र

दिव्यांका आणि विवेकची जोडी चाहत्यांना खूप आवडते . ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेच्या सेटवरून त्या दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. या शोमध्ये दिव्यांका मुख्य भूमिकेत होती. तर त्यामध्ये विवेक हा एका पोलिस निरीक्षकाच्या भूमिकेत दिसला. दोघांनी एकत्र काम केले. मग हळूहळू ते मित्र बनले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. 9 वर्षांपूर्वी त्यांनी एकमेकांशी थाटामाटात लग्न केलं.

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दिव्यांका टीव्हीवरील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. बनू में तेरी दुल्हन सारख्या शोमधून तिला ओळख मिळाली. यानंतर, त्याचा ‘ये है मोहब्बतें’ हा शो देखील सुपरहिट झाला. सध्या ती टीव्हीपासून दूर आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार