LOC वर भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांना मोठा झटका; जाणून घ्या सविस्तर

0

जम्मू-काश्मीरच्या पुंछ भागात सुरक्षापथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या एन्काऊंटरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. गुरुवारी संध्याकाळी दहशतवाद्यांच एक पथक LOC वरुन भारतीय क्षेत्रात घुसखोरी करण्याच प्रयत्न करत होतं. त्याचवेळी सर्तक असलेल्या जवानांनी सीमेपलीकडून होणारा घुसखोरीचा हा प्रयत्न उधळून लावला. तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. LOC वर खडमाल क्षेत्रात तैनात असलेल्या जवानांना सीमेपलीकडून काही हालचाल होत असल्याच दिसलं. घुसखोरीचा संशय आल्याने जवानांनी आसपासच्या सुरक्षा चौक्यांना अलर्ट केलं.

त्यानंतर दहशतवादी दृष्टीला पडताच त्यांच्यावर गोळीबार केला. सूत्रांच्या माहितीनुसार, या एन्काऊंटरमध्ये सुरक्षा पथकांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सध्या या भागात मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरु आहे. याआधी 24 जानेवारीच्या रात्री कठुआमध्ये गोळीबार झाला होता. काही दहशतवादी लपल्याचा संशय आल्यानंतर अर्ध्या रात्री मोठ्या प्रमाणाच सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

जंगलाच्या दिशेने पळाले

जवानांना रात्री दीडच्या सुमारास दहशतवाद्यांची हालचाल सुरु असल्याचा संशय आला. त्यानंतर सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. दोन्ही बाजूंकडून अर्धातास थांबून-थांबून गोळीबार सुरु होता. या गोळीबारात कोणी जखमी झालेलं नाही. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तीन दहशतवादी होते, जे कारवाईनंतर जंगलाच्या दिशेने पळाले.

25 ठिकाणांवर छापेमारी

मागच्या काही दिवसात जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस आणि सैन्याने मिळून सक्रीय दहशतवादी आणि त्यांच्या कुटुंबांच्या 25 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. या दरम्यान टीमला काही महत्त्वाची कागदपत्र आणि आक्षेपार्ह साहित्य मिळालं. NIA कोर्टाकडून मिळालेल्या वॉरंटच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. राजौरी, नौशेरा, थाना मंडी, धार हाल, कोटरंका, बुधल, मंजाकोट आणि छिंगससह विभिन्न भागांमध्ये सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं.

अधिक वाचा  पुण्यातील बाहुबली माजी नगरसेवकांचे भाजप पक्षप्रवेश; 22 माजी नगरसेवकांच्या हाती ‘कमळ’ या प्रभागात गणिते बदलली