धगधगत्या मशालीच्या साक्षीत चंद्रकांत मोकाटे यांचा शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल; स्थानिक उमेदवार ग्रामस्थ एकवटले

0

कोथरूड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना अधिकृत उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी आज ‘धगधगत्या’मसाल्याच्या साक्षीने शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये परिवर्तन घडवण्याचा संकल्प करत आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून भव्य रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला.

कोथरूड विधानसभा मतदारसंघ आणि शिवसेना यांचे एक अनोखानात आहे. आज कोथरूड विधानसभा मतदारसंघात ज्यांनी पाय रोवले आहे त्या लोकांचे कोथरूडच्या जडणघडणीमध्ये शून्य योगदान असून या आयत्या बिळात घुसलेल्या नागोबाला मशालीची धग देऊन बाहेर काढल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही. असा संकल्प करत आज कोथरुड महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, काँग्रेस आय, आम आदमी पार्टी यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून लढाई सोपी नाही हा विरोधकांना संदेश देण्यास यश मिळवले.

अधिक वाचा  भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या स्थितीत! राजकीय भूकंपही शक्य? एकनाथ शिंदेंची किंमत फक्त १२ जागा

कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये 2014 साली लाटेमुळे जे लोक सध्या खुर्च्यांवरती बसले आहेत त्यांच्यामुळे अधोगतीकडे गेले असून पुन्हा कोथरूडची प्रगती साध्य करायची असेल तर आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा महाविकास आघाडीच्या सहज उपलब्ध असणाऱ्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले. गेली दहा वर्ष भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये कोथरूड विधानसभेची सत्ता असताना सर्वसामान्य कोथरूडकर यांच्या हाती मात्र काय मिळाले नाही या उलट ज्यांनी कोथरूडकरांच्या मतावर आपली स्वतःची हिताची पोळी भाजली त्या सर्वांना धडा शिकवण्यासाठी ही मशाल धगधगती केली असून यातून परिवर्तनाचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य