खडकवासला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून या विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत स्पर्धेमुळे आज उमेदवारी अर्ज भरताना काय होते याची पूर्ण उत्सुकता संपूर्ण पूर्वी शहराला लागलेली असताना भीमराव तापकीर या विनम्र आणि सात्विक नेतृत्वासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील जनसमुदाय लोटला आणि या जन आशीर्वादातच आपल्या साधेपणाने या नेतृत्वाने चक्क दुचाकी वर जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.






खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये काही अतृप्त इच्छुकांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना गळाला लावून सलग चौथी उमेदवारी काही काळ रोखण्याचे काम केलं त्यामुळे मूळ भारतीय जनता पक्षाचा आणि भीमराव अण्णा तापकीर यांच्यावरती निस्वार्थ प्रेम करणारा कार्यकर्ता एक आठवडाभर चिंतेत होता. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर लागोलाग खडकवासला विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि निष्ठावान भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला अन् याच कार्यकर्त्यांनी पुन्हा अर्ज भरण्यासाठी केलेला जल्लोष खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये विजयी चौकार घडणारच याची प्रचिती देऊन गेला. कार्यकर्त्यांनी जागोजागी फटाके वाजवून आणि क्रेनच्या साहाय्याने भल्यामोठ्या पुष्पहाराने या रॅलीचे स्वागत केले. भीमराव तापकीर यांनी प्रथम धनकवडीचे ग्रामदैवत येथील जानुबाई देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर इच्छापूर्ती गणपतीचे दर्शन घेऊन सुरू झालेल्या रॅलीत महायुतीचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
रॅलीतील रथामधून भीमराव तापकीर यांच्यासह भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार प्रदीप रावत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी हात उंचावून नागरिकांना अभिवादन करीत होते. खडकवासला मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय असलेल्या वडगाव येथील सिंहगड महाविद्यालयात भीमराव तापकीर यांनी सपत्नीक दुचाकीवर जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
भीमराव तापकीर यांना चौथ्यांदा खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. ते म्हणाले की, गेल्या तीन वेळच्या विधानसभा कार्यकाळात केलेल्या विकासकामांच्या बळावर या निवडणुकीला सामोरे जात आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही पक्षाचा व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आला आणि त्याचे काम झाले नाही अशी कार्यपद्धती राबवल्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्य जनता ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी भक्कम उभी आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात खुर्ची मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न झाले आणि वारशासाठीही आता प्रयत्न सुरू आहेत परंतु जनतेच्या आशीर्वादाने चौथ्यांदा आमदार होणार असल्याचा विश्वास या वेळी त्यांनी व्यक्त केला.
….आपला आमदार दमदार आमदार, अब की बार चौकार,
….साधा माणूस, सर्वसामान्यांचा नेता पुन्हा होणार आमदार, अशा आशयाचे फलक घेऊन अनेक तरुण या रॅलीत सहभागी झाले होते. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिकही या मिरवणुकीत भगवी टोपी, भाजपचे उपरणे घालून सहभागी झाले होते.











