सैफ अली खानच्या शरीरात गेलेल्या चाकूच्या तुकड्याचा पहिला फोटो समोर

0

बॉलीवू़ड स्टार सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या राहत्या घरात गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हल्ला झाला. त्यावेळी जखमी झालेल्या सैफ यांना रिक्षेने त्यांना लिलावती रुग्णालयात नेण्यात आले. या जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खान डगमगले नव्हते. त्यांनी कमालीचे धाडस दाखवले. रुग्णालयात पोहचल्यावर त्यांनी स्ट्रेचर घेतले नाही. मुलाला घेऊन ते स्वत: चालत आल्याचे आम्ही पाहिले, असे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सैफ यांच्या पोटात चाकूचा तुकडा होतो. तो शस्त्रक्रिया करुन बाहेर काढण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सैफ अली खानच्या अंगावर चोरट्याने एकूण सहा वार केले होते. पहिला वार गळ्यावर केला. इतर वार हे हातावर, पाठीवर केले होते. त्यापैकी शेवटचा सहावा वार हा सैफच्या स्पायनल कॉडवर केला होता. साडेसहा सेंटीमीटरपर्यंतचा हिस्सा शरीराच्या आतमध्ये घुसला होता. स्पायनल कॉडची जी मुख्य रक्तवाहिनी होती तिच्या पासून 2 मीमीच्या दूर हा चाकूचा तुकडा अडकला होता. जर हा तुडका दोन मीमी जास्त आतमध्ये घुसला असता तर पॅरालसीसी होण्याची शक्यता होती.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

अन्यथा गंभीर दुखापत झाली असती
सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या घरात हल्ला झाला. त्या हल्ल्यात त्यांच्या पोटात चाकूचा तुकडा गेला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन तो चाकूचा तुकडा बाहेर काढला आहे. चाकू अजून खोल गेला असता तर गंभीर दुखापत झाली असती, असे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती देत सांगितले, चाकू २ मिमी अजून गेला आत गेला असता तर सैफ यांना गंभीर दुखापत झाली असती. सैफ अली खान यांनी शस्त्रक्रियाच्या वेळी आणि त्यापूर्वी चांगले धाडस दाखवले. रुग्णालयात दाखल होत असताना ते स्वत: चालत आले. त्यांनी स्ट्रेचर घेतले नाही. त्यांची प्रकृती स्टेबल आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

पोलिसांकडून एकास अटक
सैफ अली खान यांच्यावरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी एका संशयीत आरोपीला पकडले आहे. त्याचे नाव शाहिद आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. आरोपी शाहिद याला गिरगाव परिसरातून ताब्यात घेतले आहे. शाहिदवर या आधी ३-४ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. परंतु शाहिद सैफ अली खान प्रकणातील आरोपी आहे की काय हे पोलिसांनी स्पष्ट केले नाही. दरम्यान, आम्ही लवकरच हे प्रकरण उघडकीस आणू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आरोपी शाहिद याचे शेवटचे लोकेशन प्रभादेवी सापडले होते. शाहिद हा सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आहे का? त्याचा शोध पोलीस घेत आहे. शाहिदच्या घरात आरोपी 1:37 वाजता जातो आणि त्यानंतर 2:33 वाजता खाली उतरतो, असे सीसीटीव्हीमधून उघड झाले आहे. म्हणजे जवळपास 50 ते 55 मिनिटे आरोपी सैफ अली खान याच्या घरात होता.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन