पैशांपुढे नातंच विसरला, अवघ्या 500 रुपयांसाठी सख्या भावाने भावाला संपवलं

0

पैशांचा मोह हा किती वाईट असू शकतो, की त्यासाठी , तो मिळवण्यासाठी आपण काय करतोय, भलं-बुरं काय याची जाणीवही नसावी ?सद्सदविवेकबुद्धी गहाण ठेऊन काहीही करावं ? पैशांसाठी आपलं नातं विसरून, सख्ख्या भावालाच मृत्यूच्या दारात कोणी कसं ढकलू शकेल ? पण हे प्रत्यक्षात घडलं आहे, तेही मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याणमध्ये. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची एक घटना कल्याणमध्ये आधीच गाजत आहे. त्यातील आरोपीने पत्नीसह त्या मुलीच्या मृतदेहाची वाट लावली होती. हा खटला संपूर्ण राज्यात गाजत असून कल्याणमध्ये तर अतिशय खळबळ माजलेली आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

हे कमी की काय म्हणून आता त्याच कल्याणमध्ये आणखी एक खून झाला आहे. एका भावाने त्याच्या सख्या भावाचाच बळी घेतला आहे, तेही अवघ्या 500 रुपयांसाठी. पाचशे रुपयांच्या वादातून एक इसाने त्याच्या सख्ख्या भावाची धारदार चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी सलीम शमीम खानने आपल्या लहान भावाचा, नईम शमीम खानचा, चाकूने वार करत खून केला. पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम येथील रोहिदासवाडा परिसरात खान कुटुंब राहतं. या कुटुंबात आईसह तीन भाऊ एकत्र राहतात. आरोपी सलीम शमीम खान, मृत नईम शमीम खान आणि आणखी एक भाऊ असे तिघे भाऊ घरात राहतात. मात्र खुनाची ही घटना घटना घडली त्या रात्री, नईमने आपले पाचशे रुपये घेतले आहेत, असा संशय सलीम याला आला. त्यात पैशांच्या मुद्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्यामुळे संतापलेल्या सलीमने स्वयंपाकासाठी वापरणाऱ्या धारदार चाकूने नईमवर वार केले. या हल्ल्यात नईमचा जागीच मृत्यू झाला.घटनेनंतर सलीम फरार झाला. मात्र,कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याने तातडीने तपास मोहीम सुरू करून आरोपीला अवघ्या 12 तासांच्या आत अटक केली. आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, किरकोळ कारणावरून इतका मोठा अनर्थ घडल्यामुळे समाजात संताप आणि शोक व्यक्त केला जात आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा