मुंडे कुटुंब-वाल्मिक कराडच्या व्यावसायिक संबंधांचे पुरावे सार्वजनिक, अजून म्हणता संबंध नाहीत ?

0
1

राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे कुटुंबीय आणि वाल्मिक कराड यांच्यात व्यावसायिक संबंध असल्याचे पुरावे अंजली दमानिया यांनी समोर आणले आहेत. सोशल मीडिया एक्सवर अंजली दमानिया यांनी या संदर्भात कागदपत्र पोस्ट केली आहेत. वेंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस या कंपनीत राजश्री धनंजय मुंडे या संचालक आहेत. त्या कंपनीचा 2022 चा महसूल 12 कोटी 27 लाख रुपये इतका दाखण्यात आलाय. 2022 सालच्या बॅलन्स शीटमध्ये राजश्री धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक बाबूराव कराडच नाव रिलेटेड पार्टीज म्हणून दर्शवण्यात आलय. इंडिया सिमेंट कंपनीची राखेची वाहतूक हीच ट्रांसपोर्ट कंपनी करणार? म्हणजे कंपनी एकत्र, जमीन एकत्र असं म्हणत अजून बरेच खुलासे होतील, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

वेंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेसचे फिनॅनॅशियाल स्टेटमेंटही एक्सवर पोस्ट केलं असून अजून म्हणता संबंध नाहीत ? असा सवाल केला आहे. वेंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेसचे फिनॅनॅशियाल स्टेटमेंटही एक्सवर पोस्ट केलं असून अजून म्हणता संबंध नाहीत ? असा सवाल केला आहे. बीडमध्ये वाल्मिक कराड याच्या मालकीचे वाईन शॉप असल्याचाही अंजली दमानिया यांनी आरोप केलाय. बीडमधल्या या वाईन शॉप पॅटर्नवरुन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. केज, वडवणी, परळी बीड येथे वाल्मिक कराडच्या मालकीचे चार ते पाच वाईन शॉप असल्याचा दावा करण्यात आलाय.

म्हणून राजीनाम्याची मागणी

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. वाल्मिक कराडच या सगळ्यामागचा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे. हा वाल्मिक कराड मस्साजोगमधल्या खंडणी प्रकरणात बंद आहे. त्याला हत्येच्या गुन्ह्यात अजून आरोपी बनवलेलं नाही. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे धनजंय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.