रिपब्लिकन (आठवले) पक्षातुन मिनाज मेनन व वसिम पहिलवान यांची हकलपट्टी

0

पक्षाच्या बॅनरखाली अनेक गैरकृत्य केल्याने कारवाई

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पुणे शहरातील विशेष कमिटीची बैठक शुक्रवारी पक्ष कार्यालयामध्ये पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, सदरच्या बैठकीमध्ये मिनाज मेमन व वसिम पहिलवान यांची एकमताने ठराव करून पक्षातून हकालप‌ट्टी करण्यात आली.

या दोघांनी पक्षाला बदनाम करणारे कृत्य वारंवार केले आहे. पक्षाला त्यामुळे मानहानी सहन करावी लागली. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालप‌ट्टी करण्यात आली आहे.

या बैठकीस परशुराम वाडेकर, संजय सोनावणे, रोहिदास गायकवाड, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, मोहन जगताप, महिपाल वाघमारे, बसवराज गायकवाड, शाम सदाफुले, रफिक दफेदार, महेंद्र कांबळे, भगवान गायकवाड, वसंत बनसोडे, हिमाली कांबळे, महादेव दंदी, बाळासाहेब जगताप, विरेन साठे, संदिप चांदोरे उपस्थित होते.

अधिक वाचा  पुणेकरांनो, उन्हाचा चटका आणखी वाढणार! मंगळवारपासून कमाल तापमान ३६ अंशांवर जाण्याचा अंदाज

मिनाज मेमन आरपी आय मध्ये हडपसर विधानसभा अध्यक्षा होत्या काही महिन्यांपूर्वी पुण्यातील सर्व पदे रद्द करण्यात आली त्यामध्ये मिनाज मेमन यांचे अध्यक्ष पद देखील काढण्यात आले होते, त्यांचा पती सराईत गुन्हेगार इम्तियाज मेमन उर्फ बहिऱ्या पक्षाचे बॅनर लावून पद नसताना पदाचा वापर करून अनेक गैरकृत्य करत होता, नुकताच त्यांनी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करून टीव्ही, ओव्हन व रोखं पैसे लोकांकडून उकळले होते, लोकांच्या बांधकामांचे अर्जं देऊन त्यांना ब्लॅकमेल करणे हा धंदाच पक्षाचे नाव वापरून सुरु केला होता, याप्रकरणी नुकताच हडपसर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्याआधी पोलिसांचे बनावट आय डी कार्ड वापरून खंडणी गोळा केली त्याचाही गुन्हा दाखल होता, आजवर चोरी, दरोडा, दंगल, मारामारी, खंडणी असे दहा गुन्हे या सराईत गुन्हेगारावर दाखल आहेत,
इम्तियाज मेमन याने मिनाज मेमन यांच्या पदाचा वापर करून अनेकांना ब्लॅकमेल केले आहे, पक्षाने केलेल्या कारवाईचे हडपसर परिसरात स्वागत करण्यात येत आहे.

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?