कुरुलकर हनी ट्रॅपनंतर पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात पुण्यातील इंजिनिअर अडकला, NIA चौकशी करणार

0

पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर याचे हनी ट्रॅप प्रकरण नुकतेच उजेडात आले. त्या प्रकरणाची चर्चा अजून सुरु आहे. त्याचवेळी पुण्यातून आणखी एक प्रकरण समोर आले आहे. पुणे येथील नामांकीत सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत असलेला इंजिनिअर पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात आला होता. ओडिशा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यानंतर त्याला भुवनेश्वर येथे घेऊन गेले. आता त्याच्या चौकशीसाठी भुवनेश्वर येथे पथक गेले आहे.

काय आहे प्रकरण
मुळचा सातारा येथील असलेला अभिजित संजय जांबुरे याचा ओटीपी शेअरिंग घोटाळ्यात सहभाग होता. त्याने 2018 मध्ये फेसबुक मेसेंजरद्वारे पाकिस्तानातील सय्यद दानिश अली नक्वी यांच्याशी ओळख झाली. त्याने तो एका अमेरिकन आयटी कंपनीत कार्यरत असल्याचे सांगितले. त्या कंपनीसाठी दानिश काम करु लागला. त्यासाठी अभिजितने त्याचा युजर आयडी आणि पासवर्ड त्याला दिला. परंतु दानिशचा पगार अभिजितच्या खात्यात जमा होत होता. त्याला तो देत नव्हता.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

दानिशने केला असा उपयोग
दानिश याने अभिजीतवर केलेल्या या उपकारामुळे अभिजित त्याच्या जाळ्यात आला. दानिशने त्याची ओळख पाकिस्तान गुप्तहेर खुर्रम अब्दुल हमीद याच्याशी करून दिली. हमीद यांचे भारतात मोठे नेटवर्क आहे. मग अभिजीत खुर्रमच्या सूचनेनुसार भारतातील त्याच्या स्लीपर सेलला पैसे पाठवत होता. तसेच व्हॉट्सॲपद्वारे सात पाकिस्तानी नागरिक आणि 10 नायजेरियन नागरिकांशी संवाद केला होता. अभिजित याने गुजरात विद्यापीठातून पदवी मिळवली होती. या सर्व प्रकारामुळे अभिजितची चौकशी आता एनआयए करणार आहे. त्यासाठी एनआयएचे पथक मुंबईवरुन भुवनेश्वर येथे गेले आहे.