संतोष देशमुख प्रकरणात जरांगेंचा निर्वाणीचा इशारा; तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप… अन् आपण

0

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी करत बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूकमोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला.संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जनतेची आहे. जनतेची जी मागणी आहे तीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हवी असं मनोज जरांगे पाटील म्हणाले .

जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल करताना म्हटलं की, तुम्ही त्यांच्यासोबत चहा प्यायला लागले तर गुंडगिरी कशी कमी होणार? तुम्ही गुंडगिरीला बळ द्यायला लागले आहेत. तुम्ही आल्यापासून हे पूर्ण दबायला पाहिजेत, हे तर जास्तच सक्रीय झाले. तुम्ही सक्रीय केले का?निवडणुकीत खर्च झालेले पैसे असे वसूल करायला लागलात का? असे सवाल जरांगे पाटील यांनी विचारले. सरकारला गुंडच पोसायचेत, हे राज्य वेगळ्या दिशेने न्यायचंय असे आरोप जरांगेंनी केले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

मी काय करतो? काय करणार? यापेक्षा समाजाने काय ठरवलं हे महत्त्वाचं आहे. मी हटणार नाही, मी मागे सरकणार नाही.अण्णा बोलता बोलता म्हणले तुम्हाला ट्रोल करत होते तेच मला ट्रोल करतायत. पण मी सांगेन की मला ट्रोल करणाऱ्यांना मी घोडे लावत होतो. अन्याय केला तर मी सोडत नाही, जहागिरदाराची औलाद असली तरी अशा शब्दात जरांगेंनी इशारा दिला.

जरांगे म्हणाले की, मला काहीजण म्हणतात की तुम्ही कुणाचं नाव घेत नाही, तर काही जण म्हणतात लढत नाही. कोणत्या बैठका घेता, कसल्या बैठका घेता असंही विचारतात. सुरेश धस अण्णाच काफी आहे.

मराठ्यांना एक सांगतो, जो आमदार जोपर्यंत आपल्या बाजूने बोलतायत तोवर कोणत्याही पक्षाचा असुदे, त्याच्या बाजूने ठामपणाने जातीच्या सगळ्या लोकांनी उभा रहायचं. तुम्हीच मुख्यमंत्र्यांकडे जा, बीडच्या मोर्चाच्यावतीने, जितके आमदार गोळा करायचे ते करा आणि मुख्यमंत्र्यांकडे जा. त्यांना सांगा जितकी नावं घेतलीत तितके अटक करा. त्यांच्या मागचे आका धरा, हाकीन असली तर ती पण धरा अशी मागणी जरांगेंनी केली.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

जरांगे म्हणाले की, आम्ही तुमच्या मागे आहे, तुम्हाला धक्काही लागू देत नाही. संतोष भय्याच्या लेकीच्या चेहऱ्याकडे बघा, इथं भाषणं ठोकायला नाही आपण, त्या लेकराला दारात बाप दिसत नाही, त्या लेकराने बापाचं छत्र हरवलंय. तिला दु:ख आलं तर तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला. तुम्हाला या कुटुंबाच्या पाठिशी उभा रहावं लागेल. राज्यभर हे आंदोलन झालं पाहिजे. आपण मागं सरकायचं नाही.

धाडसी बना. आता वाट बघायची नाही. कुणी हल्ला केला की उत्तर जशाला तसं. तुमचा नेता आमचा दुश्मन नाही. विरोधी पक्षनेते आमचे सासरे नाहीत. कोणताही मराठ्यांचा नेता, ओबीसांचा नेता मराठ्यांच्या बाजूने उठला तर मराठ्यांनी त्यांच्या पाठिशी उभा रहायचं. उपकार विसरायचं नाही.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

सरकार आलंय, सरकार गोरगरिबांना न्याय देणार की नाही. संतोष देशमुख हत्या, परभणी प्रकरण, राजगुरुनगर, उरण, धाराशीवमध्ये झालं. अंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावी लागली. तरी ते रॅकेट पकडलं जात नाही. ज्या नेत्याने मंत्र्याने आरोपीला मदत केलीय त्यालाही आत घ्या. विरोधी पक्ष नेत्याला, मंत्र्याला अटक करायची असेल तर राज्यपालाची परवानगी लागते. त्यालाही बिचाऱ्याला काम होईल अशा शब्दात जरांगेंनी टीकाही केली.

सरकारला इशारा देताना जरांगेंनी म्हटलं की, तुमचं सरकार येऊनही मराठ्यांना न्याय मिळत नसेल आणि तुम्ही जातीयवादी सांभाळणार असाल तर आम्हाला दंडुका हातात घ्यावा लागेल. आम्ही खवळलो तर आम्हाला नावं ठेवू नका. या राज्यात सरकार पक्षाला, किंवा जातीवादी मंत्र्यांना विध्वंस घडवायचा असेल तर आम्हाला घडवायचा नाही. आमदारांनी जाऊन मुख्यमंत्र्यांसोबत बोलावं असा पुनरुच्चार जरांगेंनी केला.